Meena Kilawat

Tragedy Inspirational Classics

4.0  

Meena Kilawat

Tragedy Inspirational Classics

प्रज्वलीत आनंदवन

प्रज्वलीत आनंदवन

3 mins
8.6K


मुरलीधर बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातले ता. हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात२६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोडा गावापासून चार- पाच मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या मालमत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना स्पोर्ट कार चालवण्याचीपण आवड होती व वृत्तपत्रांतून चित्रपट समालोचने लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर व्हावे,असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

        १९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदाच काही मारधाड करावी लागली, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेंव्हा गांधीजींना समजली तेंव्हा त्यानी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले..     

        कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. या महान समाज सेवकाने आपल्या पुर्ण आयुष्याची आहूती देवून सेवाभाव कश्याला म्हणतात याची स्वत: कर्तुत्व करुन परीसापरी झिजून लोखंडाचे सोने केले.

      आमचे ता.वणी गाव वरोड्यापासुन २५ किलोमीटर आहे. मी माझ्या ममहाविद्यालयाची सहल नियोजन जास्तीत जास्त आनंदवनात जावूनच करते. काही अंशी त्या देवदुताने उभारलेल्या आनंदवनाचे वातावरण काही तरी अभेद्य शिक्षण देत असते. आमच्या संस्थेतील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी तिथे गेल्यावर हरवून जातात.काही आश्चर्य करतात. तिथे गेल्यावर कुणाचे मन उदास तर कुणाचे मन खिन्न दिसत असते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी तिथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असुन त्यांनी केलेली कलाकृती अद्वितीय अशी असते.कित्येकच वस्तू ती लोकं तयार करतात.सर्वांना कामे वाटून दिलेली असते.रिकाम कुुणीच दिसत नाही.सर्व कामात दंग असतात. उत्पन्नाला बाजारपेठाही आहेत. 

         त्या स्वर्गात सर्व अवयवहीनच दिसतात. कुणाची हाताची बोटे नाहीत तर कुणाला पायाची बोट नाहीत.कुणाची डोळे नाहीत कुणाची कान नाहीत.त्या लिबलीबणाऱ्या जखमा,जिथे तिथे बँडेज पांढऱ्या पट्या लावलेल्या असतात. किती वेदना असतील त्या जीवंत जीवांना ? काही प्रश्न पुन्हा पुन्हा प्रश्न करतात मुली त्या निरव शांततेत पुन्हा प्रश्न याची उत्तरच नसते मुळी .कोणाजवळ फक्त आतुरतेला काय समाधान लाभत असतं. नसतात त्याचे कोणी नातेवाईक कोणतेच संबध,जीवाला जीव देणारी सुद्धा कुठेच दिसत नाहीत. जवळपास तरी फटकत नाही.तो आधार कल्पतरुसारखा अवाढव्य आंनदवन ,तोच त्यांचा स्वर्ग अाहे .

         कानावर पडणाऱ्या काही आवाजांचा गलका,ह्रदय स्पंदन जोरात वाढवत पुढेपुढे चालून जावुन त्या बागेकडे लक्ष वेधून त्यांना नविन फुलांबद्दल माहिती दिली.त्यात काही किडलेल्या, सडलेल्या कळ्या,काही ताजी टवटवित फुले या गुलाबाच्या बागा,असंख्य फुलाचे ताटवे,बघा तो रंग गुलाबाचा किती सुंदर आहे नाही का? एवढ्यात एक बाई समोरून येतांना दिसली.एकिने तिला काहीतरी विचारले,ती बाई निघून गेल्यावर इकडे लहान आवाजात बोलने चालू झाले.. ती तरून असतांना किती सुंदर होती.तिच ना ती.! किती विद्रृप झालेली आताशी ! तीने काय पाप केले असेल ग.!एवढी मोठी सजा,कोणत्या देवाने दिली असेल तिला.!मी शून्यात एकटक बघत निशब्द वज्रपात झाल्यासारखी . काय ही प्रकृती आणि विकृती सोबतच असतात?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy