Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

आपला आपला घटस्फोट

आपला आपला घटस्फोट

2 mins
238


अव धनी,


सकाळी सकाळीच कारभारणीन आवाज दिला, 

उठा! उठा! लवकर उठा! 


काय झालं? कशाला  वरारडतीस ?


अव धनी आज आपल्या लग्नाला पंधरा वर्षे पुरी झाली. 


बर मंग म्या काय करू? 


काय म्हणजे? तुम्ही आता मला पटकूनी घटस्फोट द्या


 अगं काय तुझं डोकं फिरलं का? म्या ताडकन हतरूणाच्या बाहेर आलो.

अगं घटस्पोट म्हणजे काय टीव्ही खरेदी करायचा आहे का ?मी खरेदी करायचा आणि तुला आणून द्यायचा.


 अहो पटकुनी घटस्पोट द्या! 


 म्हणजे काय? तू काय बोलते? तुला कळतंय का?


 हो हो मला चांगलंच कळतंय !


हे बघा ! आपण गाव वाली माणसं, येडी बागडी!


 आपल्याला पण टीव्ही मध्ये यायचं, पेपर मंदी याच असल! तर मला पटदिशी घटस्पोट द्या.


आता मला देखील तिच्या बोलण्याची गंमत वाटू लागली.

अगं कारभारणी! मोठ्या लोकांच सगळं मोठं असतं.त्यांचे कौतुक होतं.


आपल्याला कोण विचारणार ?

साधा आपल्या गावचा पत्रकार देखील फिरकायचा नाही, आणि शिवाय लोक आपल्या तोंडात शेण घालतील. 


अव कारभारी! काल मी टीव्ही बघितला, त्योआमिर खान आणि किरण राव त्यांनी म्हण हसत खेळत घटस्पोट घेतला. 

लोकांनी कुठे त्यांच्या तोंडात शेण घातलंय? त्यांचा तर उदो उदो करतेत, मंग आपल्या तोंडात काय म्हणून शेण घालतील? 


अगं तो हिरो हाय! 

अॅक्टर हाय! त्याची गोष्ट वेगळी. 


बर तुला माझ्यापासून घटस्पोट का पाहिजे? 


का म्हणजे? टीव्हीत दिसण्यासाठी !


मी काय तुला त्रास देतो? मारझोड करतो? 


अजाबात नाय! तुम्ही काय मला मारशीला? 

म्या एक धक्का मारला तर ,जाता कुठल्याकुठे तुम्ही.


तुम्ही काय मला मारणार? 


अगं मग तुला घटस्पोट का पाहिजे? 


आपल्या लग्नाला पंधरा वर्षे झाली म्हणून. 


अग असा कुठे नियम आहे का? लग्नाला पंधरा वर्षे झाले की घटस्फोट द्यायचा.


 हो ना! अव! आपण मोठ्या माणसासारखे वागले पाहिजे .तरच आपण त्यांच्यासारखे मोठे होऊ. 


 त्यांनी शेण खाल्ले, म्हणून आपण पण खाऊ? 


अहो त्यांच्या संसारात कुठे दुःख होतं ?त्यांनी तर सांगितलं की, आम्ही पंधरा वर्षे हसत-खेळत संसार केला. आणि आता आम्ही हसत-खेळत वेगळे होतोय.

 मग आपण पण हसत-खेळत वेगळे होऊ या? 

 मग आपण जरा लांब लांब राहिलो ना, की जोराने समाजकार्य करू. 


नको! नको! तसले समाजकार्य आपल्याला नको. 


आपले दोन लेकरं आणि आपला सुखाचा संसार बरा आहे. 


टीव्हीत येण्यासाठी आपण काय काडीमोड घ्यायचा? 


पण मी कुठे म्हणलं काडीमोड घ्यायचा? 


मी तर म्हणले घटस्फोट घ्यायचा .


अग कारभारणी घटस्फोट, आणि काडीमोड आणि डिवोर्स सगळे एकच गोष्ट असते. 


मंग पाहिजे का तुला काडीमोड? 


नको बया मी आपली सकाळी सकाळी गंमत केली


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy