आनंदी राज्य
आनंदी राज्य
आनंद नगर नावाचे राज्य होते. तिथली सारी प्रजा आनंदात होती. राज्यातील कोणी दुःखी नसावे ह्याची राजा काळजी घ्यायचा. कोणाला काही समस्या असेल तर ते राजाला येऊन सांगत आणि मग राजा योग्य ती मदत करून समस्या सोडवतं असे.
राजाने राजकुमार आनंदचे लग्न करायचे ठरवले. गावोगावात दवंडी पिटवण्यात आली की राजकुमाराच लग्न करायच ठरवलय तर सुयोग्य राजकुमारींनी दरबारी यावे.
सुनियोजित दिवशी वेगवेगळ्या राजकुमारीका आनंद नगर मधे दाखल झाल्या. सगळ्या नटुन थटुन आल्या होत्या. राजकुमार आनंदचे लक्ष गेले एका राजकुमारीकडे लक्ष गेले. ती दिसायला नक्षत्रासारखी होती. पण ती दुःखी दिसत होती. आनंदनगरात कोणी दुःखी नव्हतं. त्यामुळेच आनंदच त्या राजकुमारीकडे लक्ष गेलं.
त्याला वाटलं एवढ्या सुंदर मुखवट्यामागे काय बर दुःख असेल असा प्रश्न आनंदला भेडसावत होता. मग त्याने ठरवल की हिच्याशीच लग्न करायच आणि तिला आनंदी करायच.
त्याचा हा निर्णय ऐकून आनंदनगर राज्यातील लोकांना आश्चर्य वाटलं. मग राजकुमाराने सांगितल की मी एक आव्हान म्हणून स्वीकारलय.ह्या राजकुमारीला आनंदी करायचा.
आनंदच राजकुमारी ललिताशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर राजवाड्यात तिचं छान स्वागत झालं. आनंदच्या आईने तिला जवळ घेतलं. त्या मायेच्या स्पर्शाने ती सुखावली. अलगद तिच्या डोळ्यातुन अश्रू आले. ती त्यांच्या कुशीत शिरुन रडली. तिला बर वाटलं.
रात्री ती राजकुमार आनंदच्या दालनात गेली तेव्हा पण तिच्या चेहर्यावर ताण दिसतं होता.आनंद म्हणाला ,"ललिता ,तुमचे दुःख काय मला ठाऊक नाही. पण तुम्हाला आनंदी करायच या ध्येयाने मी तुमच्याशी लग्न केलयं. तर मोकळेपणाने रहा. तुमच्या मनातल सांगा. तेव्हाच तुम्ही आनंदी राहू शकाल."
ललिता खाली मान घालून ," हो" एवढच उद्गारली.
दुसर्या दिवशी राजकुमार तिला म्हणाला ," तुम्ही आवरुन या. राजवाड्याच्या मागे छान मंदीर आहे. तिथे आपण जाऊ."
दोघेही मंदिरात गेले. तिथे सनईवादन चालू होते. बायका भूपाळ्या गात होत्या. गाभाऱ्यात देवाची छान पुजा केलेली होती. छान प्रसन्न वातावरण होते. तिथल्या वातावरणाने ललिता खुश झाली. तिच्या चेहर्यावर आनंदाची लकेर दिसली. राजकुमार आपली खूप काळजी घेतोय हे तिला पदोपदी जाणवतं होतं.
हळुहळू ती राज्यात रमु लागली. राज्यातील लोकांचे आनंदी चेहरे पाहून ती खुश होयची.
राजकुमार तिच्या मनातल काढून घ्यायचा प्रयत्न करतं होता. एक दिवशी बोलता बोलता ती बोलली," माझी काळजी करणारी, मला आनंदी ठेवणारी माणसे मला मिळाली. तुम्ही आणि तुमची आई माझी किती काळजी घेता. माझी आई मी दहा वर्षांची होती तेव्हा देवाघरी गेली. माझ्या वडीलांनी मला आईची माया मिळावी म्हणून दुसर लग्न केलं. पण तिने मला जवळ घेऊन आईसारखी माया केली नाही. आईच्या आठवणीने मी रडायचे तर मी रडते म्हणून ती माझ्या अंगावर ओरडायची. मी ही गोष्ट वडीलांना सांगू शकले नाही. मी एकलकोंडी झाला. मनात झुरत राहिले. त्यामुळेच मी दुःखी असायचे. मला कोणी जाणून घेतलं नाही. पण आता मला समजून घेणारे, प्रेम करणारे तुम्ही भेटलात. या राज्यात मी पण इतर लोकांसारखीच आनंदी राहणार असं म्हणत ती राजकुमार आनंदच्या कुशीत विसावली.
आनंदाच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहातं होता. आपल्या राज्यात येऊन ललिता आनंदी झाली.राज्याच आनंद नगर हे नाव किती समर्पक आहे याचा त्याला आनंद वाटला.
