आमचाही देश होणार म्हणे महासत्ता ?
आमचाही देश होणार म्हणे महासत्ता ?


आमचाही देश होणार म्हणे महासत्ता? या भ्रमातच आम्ही जगतो आहोत. ठोसर भिका-यांकडेच अापले मागणे मागतो आहोत. महागाईच्या भडक्यात सामान्यजन होरपळतो आहे. भ्रष्टाचार, कर्जबाजारीपणाला कंटाळून फास गळी लावताहेत. जीव जाईना म्हणुन जो तो हातपाय खोडतो आहे. टेबलाखालून दिल्याशिवाय एक काम धड होत नाही . अराजक माजले चोहीकडे, जनजीवन हवालदील आहे.
संधीसाधू नेते, भ्रष्ट मुजोर नोकरशहा आणि आपल्या ह्क्कांसाठी झगड्न्याबाबत उदासीन जनता सगळीकडे आनंदी आनंद आहे. अतिरेकी नाचताहेत आमच्या छाताडावर द्प्तर दिरंगाई, फायलिंगमध्येच सरकारी धोरण कुजत आहे. लुटारुंच्या टोळ्या नाक्या - नाक्यावर. विकाऊ सत्ताधीश तर
कधी विरोधी बाकावर. लोकशाही कुठेच दिसत नाही, पुंजिवादी दंडुकेशाहीचाच नंगानाच आहे. हुंड्यापायी भगिनी जळताना,भर रस्त्यात भगीनीला पळता बघतांना, अपघातग्रस्त तड्फडतांना, कागदांची पुरचुंडी घेवुन टिचभर पोटाची खळ्गी भरण्याकरीता वणवण करणार तरूण बघतांना. आम्हाला आता कशाचंच काही वाटेनासं झालंय. मुर्दाड झालीय आमची संवेदना आम्ही फक्त भावनाशून्य धडं म्हणून वावरतो आहे समाजात. इतक का आपण माणुसकीला पारखे झालोय.
एक दिवस येईल आपलाही रोटी कपडा मकान या विवंचनेतंच तो आख्खी जिंद्गानी खर्ची घालवतो आहे. तो एक राजहंस जणू अंधारातच चाचपड्तो आहे. अनं म्हणे आमचाही देश होणार म्हणे महासत्ता?