Jyoti gosavi

Comedy Others

3  

Jyoti gosavi

Comedy Others

आळशी लुगडं नेसन

आळशी लुगडं नेसन

1 min
184


आभाळा न दिवस दिसन

 आळशी लुगडं नेसन


ही एक अस्सल ग्रामीण म्हणन आहे .

याचा अर्थ एखाद्या गोष्टीला निमित्त पाहिजे.

मुळात आधीच आभाळ आलेल आहे .त्यामुळे सूर्य उगवलेला नाही, किंवा उगवला असेल पण दिसत नाही. 

त्यामुळे उजाडल आहे की नाही ,ते समजत नाही. आणि त्यामुळे आळशी बाई अजून लुगडं नेसत नाही. 


आता लुगडं का नेसत नाही? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा पूर्वी कपड्याची वानवा होती. 

"एक दांडीला आणि एक गांडीला" म्हणजे एक दोरीवर वाळतंय आणि एक अंगावर ,अशी पद्धत होती. कधी कधी तर एकच लुगड असायचं, मग ते धुऊन रात्री वाळत घालायचं, सकाळी उठून ते नेसायचं. 

तोपर्यंत रात्रभर गोधडी मध्ये उघडच झोपायचं ,अशी परिस्थिती होती. 

म्हणून 

"आभाळानं दिवस दिसन,

तिला वाटतंय अजून उजाडले नाही, अजून वेळ आहे .म्हणून ती उठत नाही आणि कामाला पण लागत नाही. 

आळशी लुगडं नेसना.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy