Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Shailesh Palkar

Thriller


3.4  

Shailesh Palkar

Thriller


आजोबा

आजोबा

1 min 299 1 min 299

माझ्या जन्माआधी तीन वर्षांपूर्वी माझ्या आजोबांचा मृत्यू झाला. त्यादिवशी भर दिवाळीमध्ये कोणताही सण नसलेला भाकर दिवस होता. माझा जन्म झाला तेव्हा दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि नरकचतुर्दशी या दोन दिवसांमधील भाकर दिवस होता. मराठी पंचांगानुसार कोणतीही तिथी नसलेले हे दोन दिवस होते. माझे आजोबा मांत्रिक होते आणि मी मात्र पत्रकार. तरीदेखील वयाच्या 38 व्या वर्षी मला कडव्या देवभक्तीचे वेड लागले. आता मला जाणवत आहे की माझ्या अंतर्मनातील बदल फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. माझ्या जीवनातील माझी ओळख असणाऱ्या गोष्टी माझ्यापासून दुरावत गेल्या आणि आता मी काहीसा जप, जाप, मंत्र, तंत्र विद्येकडे आपोआपच वळू लागलो आहे‌. सर्वकाही विलक्षण बदल घडत असताना मी माझे स्वत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. जे स्वत्व माझेच होते; ते आता मला राखण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. एका व्यक्तिमत्वावर दुसरे व्यक्तिमत्व प्रभाव निर्माण करीत आहे. अशावेळी मी मानसशास्त्राचा अभ्यास सुरु करून माझे व्यक्तिमत्व दुहेरी होत असल्याबद्दल इतरांचे पूर्वानुभव वाचून पुन्हा स्वत्वाकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न करीत असताना दोन व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष याची देही याची डोळा अनुभवत आहे. आजोबा कि नातू? काय होणार पुढे आता याचीच प्रतीक्षा आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Shailesh Palkar

Similar marathi story from Thriller