Shailesh Palkar

Drama Fantasy

4.3  

Shailesh Palkar

Drama Fantasy

परकाया प्रवेश

परकाया प्रवेश

26 mins
394


कोणे एके काळी तळकोकणातील गुहागरात एका तेजस्वी साधुचे आगमन झाले. तेजपुंज, बलदंडए, भगवी कफनी, भगवे मुंडासे, पायी खडावा, कपाळी भस्म, हाती भिक्षापात्र, गळयांत व दंडास रुद्राक्षाच्या माळा, दाढी पूर्ण वाढलेली, जटाधारी मात्र तरीही स्वच्छ व काळयाभोस केसांचा तो साधू सर्व विकारमुक्त निर्विकार, प्रसन्न चेहऱ्याने दोन नद्यांच्या संगमावरील ग्रामदेवतेच्या शिळेपाशी येऊन थांबला. तो परिसर त्यांनी स्वच्छ कला. त्यांच्याजवळील वस्त्रे त्यांनी नदीमध्ये स्वच्छ धुतली आणि झाडांच्या फांद्यांवर वाळत घातली. स्वत: नदीमध्ये उतरुन सचैल स्नान कले. त्यांनी श्वास रोखला. नासिका रंध्र हाताच्या चिमटीत बंद केली आणि नदीचा तळ गाठून काही वेळाने वर आले. त्यांच्या हातामध्ये दोन गारगोटीचे दगड होते. त्यांनी ते किनाऱ्याकडे भिरकावले. समोरील डोंगराने लालीमा ल्याली. सूर्यदेवाचे आगमन क्षितिजावर होण्यालागली. साधुने आपले अर्धे अंग पाण्याबाहेर राहिल एवढया उथळ ठिकाणी पावले टाकली. ते स्तब्ध झाले. एव्हाना पक्षी, फुले, वृक्ष, वेली जणू साराच आसमंत सूर्यदेवाच्या स्वागतासाठी नित्यनेमाने सिध्द झाला. मात्र, आज त्या साऱ्यांनाच साक्षीदार व्हावे लागणार होते. ते साधू महाराजांच्या अर्घ्यविधीच्या खणखणीत मंत्रोच्चाराचे. सूर्याच्या दिशेने पूर्वेला तेजाशी एकटक नजर भिडवित साधुंनी हाताच्या तळहातावर पाणी घेऊन मध्येमेवरुन नदीत सोडले. पूर्वेकडे बघत ते उलटपावली नदीच्या पात्राबाहेर आले. किनाऱ्यावर येऊन त्यांनी आपल्या सर्वांगावरुन पाणी निथळविले. धुतवस्त्रे परिधान केली. गारगोटीचे पाषाण वाळवून उचलले. काही शुष्क फुले, पाने व वाळलेल्या गवताचे पुंजके उचलून शेकोटीसारखे रचले आणि अग्निदेवतेचे स्मरण करुन ते गारगोटीचे पाषाण एकमेकांवर घासण्यास सुरुवात केली. ठिणग्या उडून गवताने पेट घेतला. फुंकर घालून त्यांनी वन्ही चेतविला. ते तेथून उठले. जमिनवरील गवतामध्ये पडलेल्या गोवऱ्या गोळा करुन शेकोटीभोवती रचल्या. त्यांनी पद्मासन घालून दीर्घश्वास घेतला. डोळे मिटून ध्यानस्थ झाले. 'ओऽऽम्!' त्यांच्या मुखातून दीर्घ ओंकार व्यक्त होताच साऱ्या सृष्टीला प्रसन्नता आली. काही काळ ओंकार जप झाल्यानंतर त्.यांनी गायत्री मंत्रोच्चारास प्रारंभ केला आणि त्यांच्या धीरगंभीर स्वरांनी गावाची पहाट शुध्द झाली. नदीच्या संगमावर याच सुमारास काही महिला डोईवर अन् कमरेत मडकी व हंडे घेऊन पाणी भरण्यास निघाल्या. त्यांचे चित्त त्यांच्या गायत्री मंत्रपठणाने वेधले गेले. पाणी भरुन परतताना सर्वांनीच डोईवरील, कमरेवरील जलपात्रं भुईवर ठेवली आणि दुरुनच साधुमहाराजांना नम्रपणे वंदन करुन त्या मार्गस्थ झाल्या. यानंतर गावात साधुमहाराजांच्या आगमनाची वर्दी पोहोचली. अनेकांनी फळे व केळी तसेच शिधा घेऊन संगमाकडे धाव घेतली. मात्र, साधुमहाराजांची समाधी लागली होती. त्यामुळे केवळ मनोभावे नमस्कार करुनच सारे गावाकडे परतले. टळटळीत उन्हं, सूर्यदेव मध्यान्हीला आला. साधुमहाराज त्यामुळे जराही विचलीत न होता ध्यानस्थ राहून मंत्रपठण करीत राहिले. काही गुराखी गायी-गुरे घेऊन संगमावर आले. त्यांनी साधुमहाराजांचे ध्यानस्थ रुप पाहून हात जोडले. सूर्य अस्तास गेला. साधुमहाराजांचा जप थांबला. त्यांनी पुन्हा नदीकडे प्रयाण केले. संध्या अर्चा केली. गावकऱ्यांनी ठेवलेल्या फळांचा आस्वाद घेतला. तेथून ते जंगलात समिधा गोळा करण्यास गेले.

--------#####----

साधुमहाराजांचा दिनक्रम ठरलेला तसाच प्रात:काळी संगमावर पाणी भरण्यास येणाऱ्या महिला, गुराखी व त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भाविक ग्रामस्थांचाही ठरला. त्यामुळे साधुमहाराजांचे संभाषण होऊ शकत नसे. साधारणत: एकविसावा दिवस उजाडला. सारे दिनक्रम नित्यनेमाचे झाले. हा दिवसही तसाच मावळला आणि साधु महाराज समिधा गोळा करण्यासाठी जंगलामध्ये शिरले. तेथे एक शेठजी एक बकरीचे पिल्लू घेऊन जातना त्यांना दिसला. ओरत असलेल्या त्या कोकरास शेठजी फरफटत कान ओढत घेऊन निघाला होता. साधुमहाराजांनी उत्सुकतेपोटी त्याचा पाठलाग केला. जंगलातील मोठया पाषाणाजवळ एक आदिवासी मांत्रिक बसला होता. त्याच्याभोवती दोन गर्भार आदिवासी महिला त्याला पानांच्या झावळीने वारा घालत होत्या. त्याच्या हातामध्ये चिलिमसदृश्य हुक्का तर पुढयामध्ये मदिरापात्र होते. शेठजी कोकरासमवेत तेथे पोहोचले. त्यांनी त्या मांत्रिकास साष्टांग दंडवत घातले. 'देवा महाराजा! आज अकरावी आमावस. आजपावेतो दहा कोकरं दिलं आणि आता ह्ये अकरावं हाय! जशी मागणी झाली तशी चोख व्यवस्था केली. अकराव्या कोकरानं लेकराची चाहुल लागावी महाराजा! शेठजीच्या आगतिकपणे प्रार्थनेतून साधुमहाराजांना तो पुत्रइच्छूक असल्याचे समजून आले. आदिवासी मांत्रिकाने 'शेठजी, नवसाची अखेरची आमावस हाय पण....' मदिरेचे पात्र तोंडाला लावित आवंढयासोबत प्राशनही केले. मिशांना लागलेली दारु हाताने ओठांवर आणून त्यावरुन जीभ फिरवित तो म्हणाला, 'प्रचिती येईल, अनुभव येईल तुझ्या शेठाणीला. लेकराची चाहूल लागल. आता औंदाच्या पुनवेला तु शेठाणीला घेऊन ये. या बाया बग! हायेना पोटाशी?' त्यांना पोरगा-पोरगी कायबी चालंल पण कूस उजवली पाह्यजे होती. अकरा अवसेला अकरा कोंबरं दिलं आन् अनुभव आला. आता पुढं बाळंत होईस्तोवर परत्येक आमावसेला मला वारा घालतील तर आपसूक पोरं जन्माला घालतील. काय बायांनो? त्या मांत्रिकाचा कटाक्ष पडताच दोन्ही महिलांनी त्यांना वंदन कले. शेठजी या अनुभवाने हर्षाल्हासित झाला तो पुन्हा त्या मांत्रिकासमोर नतमस्तक झाला. मांत्रिक काहीसा झिंगत उठला. त्याने त्या कोकराचा कान धरला. ते आगतिकपणे ओरडले. शेठजीने हात जोडले. मांत्रिकाने हातामधील परशुची धार बोटाने चाचपली. एका विशाल शिळेसमोर काहीतरी विचित्र आवाजात पुटपुटला अन् शेवटी 'हा निवेद मान्य कर! शेठजीला पोर दे देवी!' असा मोठया आवाजात आवाहन करीत त्याने परशु उचलले आणि क्षणार्धात त्या कोकराचे कान धरलेली मान धडावेगळी झाली. तोच साधुमहाराज त्यांच्यासमोर गेले. 'इश्वराला हत्या मान्य नाही. प्राणीहत्या पाप आहे. अशाने का मूलं-बाळं होतात? त्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. तो वेदमान्य आहे. तेथे बळी नकोत. शेठजी तुमचे उपाय संपले तरी यश आले नाही तर यज्ञाचा मार्गही अनुभवा. मी स्वत: यज्ञ करीन' साधु महाराजांचे तेजस्जवकीगररुप आणि गंभीर आवाज मांत्रिकाच्या देवतेसमोरील मशालींच्या प्रकाशात थरार निर्माण करीत होते. तो मांत्रिकही काहीसा कचरला. मात्र्या त्याच्यावरील मद्याचा अंमल त्यास उर्मी प्रदान करीत होता. 'एऽऽ! गोसावडयाऽऽ! गुमान निघ नाय तर कोकराच्या मुंडीसारखी तुजी बी उडविन! मांत्रिकाने पुन्हा परशु उचलला. त्यावर शांतपणे साधुमहाराज उच्चारले, 'अहिंसा परमोधर्म।' त्यांनी मांत्रिकाचे परशु वरचे वर धरुन खेचले आणि काळोखात भिरकावले. मांत्रिकाने दोन हात करण्याची आपली क्षमता नसल्याचे ओळखून परशु शोधायच्या निमित्ताने अंधारात पळ काढला. त्या गर्भार महिलाही तेथून पसार झाल्या. साधु महाराज आणि शेठजी हे दोघेच तेथे होते. ते कोकरु आता निश्चिंत होऊन पडले होते. शेठजी झाल्या प्रकाराने अधिकच बेचैन झाले होते. 'साधुमहाराज, मांत्रिकाचे प्रयत्न आज पूर्ण होणार होते. प्रचिती काय मागाहून आलीच असती. पण माफ करा, आपणच विघ्न आणलेत. मी गावातला महादेव वाणी. मला मूल बाळ नाही. आता वयही ओसरु लागलेय. हकीम म्हणा, वैद्य म्हणा, सारे उपाय थकले. आता हा शेवटचा उपाय म्हणून बाहेरचं बघितलं. तोही प्रयत्न आज तुमच्यामुळे शेवटच्या क्षणी....' महादेव वाणी खूपच निराश होऊन म्हणाला.

साधु महाराजांनी हातातील समिधांची शिदोरी जमिनीवर ठेवीत म्हणाले, 'कोणी कोणास दिधले जे प्राक्तनीच नव्हते. शेठजी तुमच्या नशिबात संतानप्राप्ती जरुन आहे. मात्र, त्यासाठी काही व्रत, पथ्य सांभाळावी लागतील. येत्या पौर्णिमेपर्यंत मांसाहार वर्ज्य करा. मी काही वनौषधी देतो, त्यांचे नियमानुसार सेवन करा. व्यापारात प्रवास टाळा. पत्नीसाठी कुलाचार पाळावे लागतील. त्यानंतरच्या अष्टमीला उभयतांनी पुत्रकामेष्टी यज्ञास अनुष्ठीत करावे. फलप्राप्ती अल्पावधीतच येईल. हा केवळ प्रयत्न नाही हे शेवठी तुमच्या नशिबात जे आहे ते मिळविण्याची इश्वरचरणी प्रार्थना आहे. मी त्यासाठी होम हवन करेन. तुम्ही नि:शंक रहा. उद्या पहाटेपासून व्रतारंभ करा. प्रतिपदा आहे.

वाणी शेठ काहीसा सावरला. त्याने साधुमहाराजांचे शब्द कानात साठवित घराकडे प्रयाण केले.

------####--------

पहाटेच्या सुमारास साधुमहाराज आपल्या नित्यक्रमानुसार नदीच्या संगमावर ध्यानस्थ बसण्यापूर्वी शेकोटी प्रज्वलित करीत असताना महादेव वाणी तेथे लगबगीने आला. त्याने साधुमहाराजांना वंदन केले. 'महाराज आपल्या आज्ञेनुसार मी पुत्रकामेष्टी यज्ञाची पुर्वपिठिका समजून घेण्यास आलो आहे.' साधुमहाराजांनी त्यास सारे व्रत आणि पथ्ये समजावून सांगितली. आपल्या झोळीतून काही वनौषधी देत त्यांच्या सेवनाच्या पध्दती आणि वेळाही महादेव वाण्यास समजावून सांगितल्या. पत्नीसाठी करावयाची व्रतंही त्यांनी महादेव वाण्यास सांगितली. तो तेथून निघून गेला. आता पुत्रकामेष्टी यज्ञाच्या समिधाही साधुमहाराज रोज सायंकाळी रोजच्या समिधांसोबत गोळा करु लागले.

कार्तिक वद्य अष्टमी. महादेव वाणी सपत्नीक पुत्रकामेष्टी यज्ञाचे अनुष्ठान करणार. साधुमहाराज तब्बल महिन्यानंतर गावात येणार. गावकऱ्यांना एव्हाना ही खबर पोहोचली होती. वाण्यानेही सणासुदीचे दिवस व्यापार बंद ठेवला. दुकानातील सामान गोदामात पाठवून तेथे यज्ञवेदी रचल्या. सारे वातावरण मंगलमय होते. साधुमहाराजांनी पहाटेच सर्व समिधांनिशी गावात प्रवेश केला. महादेव वाणी आणि त्याच्या पत्नीने त्यांना साष्टांग दंडवत घालून घरामध्ये त्यांचे स्वागत केले. पुत्रकामेष्टी मंत्रोच्चारास सुरुवात झाली. यज्ञात समिधांची आहुती, तुपाची, तेलाची आहुती, शुष्क पुलांची आहुती, पाच फळांची आहुती, तांदूळ व एकदल धान्याची आहुती प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पडू लागली. दिवस मावळतीला जाण्यापूर्वीच यज्ञविधी पूर्ण करुन ग्रामदैवत, कुलदैवतांचे दर्शन घेऊन महादेव वाण्याने सपत्नीक महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आणि हा प्रसाद स्वत: साधु महाराज यज्ञवेदीवर तयार करणार होते. त्यानुसार सर्वकाही पूर्वनियोजनाप्रमाणे पार पडले. साधुमहाराजांना दान करण्याचा विधी जवळ आला तेव्हा महादेव वाण्याने आपल्याजवळील संपत्तीचे त्यांच्यासमोर प्रदर्शनच मांडले. साधुमहाराजांनी ते नाकारुन परसावनातून एक लाल भोपला आणावयास त्याच्या पत्नीस सांगितले. साधुमहाराज त्या उभयतांना 'पुत्रप्राप्ती भव:।' आशीर्वाद देत नदीच्या संगमस्थळी पोहोचले.

-------#####-------

दिवसांमागून दिवस गेले. तेव्हा महादेव वाण्याच्या पत्नीसाठी दिवस गेले. वाण्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने ताटात मिष्ठान्न घेऊन थेट नदीच्या संगमावरील साधुमहाराजांच्या प्रार्थनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे साधुमहाराजांची इश्वराधनेत समाधी लागली होती. त्यामुळे वाण्याने ते ताट तेथे ठेवले आणि तो घरी परतला. सायंकाळी साधुमहाराजांची समाधी अवस्था संपली. त्यांनी समोरचे मिष्ठान्न पाहिले. त्यास हाताने स्पर्श केला. हा स्पर्श त्यांना काहीसा विचित्र पुर्वानुमान देणारा वाटला. त्यांनी सारे मिष्ठान्न गुराख्यांना वाटले.

------########---------

महादेव वाण्याने गावात सर्वांना साखर वाटून ही आनंदाची बातमी सांगितली. दुकानात व्यापार करीत असताना अचानक तेथे आदिवासी मांत्रिक आला. 'शेठजी काय वाटतोस? तुझ्या बायडीचे दीस भरले काय? शेवटी आपला अकरा कोकरांचा निवेद कामी आला की नाय? अरे, कोकरु देतो लेकरु! जंगलातल्या पाषाणदेवाची कृपा झाली. नाय तर त्या गोसावडयाने ऐन वक्ताला घातला व्हता. देवानं सारं ऐकलं बरं!' शेठजीने मांत्रिकाच्या हातावर साखर ठेवीत म्हटले, 'त्या साधुमहाराजांचीच कृपा झाली.' मांत्रिकाने तळहातावरची साखर फेकून दिली. 'मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर? अरे, वाण्या तुला अक्कल नाहीरे. पोरंबाळं कधी होतात? तुला का नाय झालं? माझ्याकडे त्या दोन पोटुशी बायका पाह्यल्यास ना? अरे माझी मेहनत व्हती ती. पाषाण देवाचा निवेद आणि माझी सेवा केली त्या बायांनी. झाल्या लेकुरवाळया. तुझ्या बाईला तु माझ्याकडे सेवा करायला धाडली असतीस तर ती बी झाली असती लेकुरवाळी. मेहनत माझ्या ऐवजी त्या गोसावडयानं घेतलं आसल बरं. तु राह्यला अंडा खानारा फकीर. तुला मेहनतीतलं काय समजणार? त्या गोसावडयानं घेतलान मेहनत. तुझ्या बायडीनं सेवा केलान काय त्याची?' मांत्रिकाची आगपाखड होताना महादेव वाणीही काहीसा विचलीत झाला. तो म्हणाला, 'माझी बायको काही त्यांच्या सेवेला गेली नाही. आम्ही यज्ञ केला आणि त्यानंतर त्यांनी प्रसाद दिला. प्रचिती आली.'

मांत्रिकाच्या मनातले जहरी विचार विखार होऊन व्यक्त होऊ लागले. 'अरे तु मरद होतास ना शेठजी? मग तुला मेहनतीचे काय फळ मिळाले. आतआता त्या गोसावडयाची मेहनत कधी झाली? ह्ये काय तुझी बायडी सांगेल? माझी अवलाद अनेकांच्या वंशाचा दिवा बनलेय. तिथे तुझ्या वंशाचा दिवा त्या गोसावडयाची अवलाद झाली तर तु थोडीच बोलून दाखविणार आहेस? आता वाट साखर गावाला! तुझी बायकोच बघ बाळंत झाल्यावर त्या गोसावडयाच्या आहारी जाईल. मग बस पैका गोळा करीत. तिकडे तिला पोरंच पोरं व्हतील.' मांत्रिक मनातलं जहर शेठजीच्या कानात ओकून तेथून निघून गेला.

------#########--------

साधुमहाराजांबाबतचं मांत्रिकाचं बोलणं महादेव वाण्याच्या मनात घर करुन बसलं होतं. त्याने तसं तसावं अशी मनोमन अपेक्षाही धरली. पत्नीला विश्वासात घेऊन त्याने एकदा तिला विचारले. 'साधुमहाराज कसे वाटले? कधी त्यांचे दर्शन घ्यावेसे वाटत नाही? त्याच्या मनातील संशयाचे भूत त्याच्या पत्नीच्या लक्षातच आले नाही. ती म्हणाली, 'माझ्यासाठी ते देवासारखे आहेत. स्त्रीला मातृत्व नसेल तर किंमत नाही. तुमच्यासारखा पती आणि साधुमहाराजांच्या आशीर्वादाने मुलगा झाला तर आली वंशवेलच फुलेल. आता माझे पाय भारी झालेत म्हणून. नाहीतर मी पूर्वी पाण्याला नदीच्या संगमावर जात असे. तिथेच आम्ही साऱ्या बायका साधुमहाराजांचे पहाटे ते ध्यानस्थ बसले असताना दर्शन घ्यायचो. आजही त्यांचा तेजस्वी चेहरा मला झोपेत नजरेसमोर येतो. तुला मुलगा होईल असा आशीर्वाद देत अंतर्धान पावतो. सकाळी उठल्यावर मी अंथरुणातूनच त्यांना प्रथम वंदन करते. महादेव वाण्याची बायको खूपच श्रध्दाशील होऊन साधुमहाराजांविषयी बोलत होती. मात्र, तिचे साधु महाराजांविषयीचे विचार ऐकून वाण्याच्या मनात मांत्रिकाने भरलेल्या विषाचे डंख त्याला सतावू लागले.

------########-------

महादेव वाण्याच्या मनातील संशयाचं भूत आणि मांत्रिकाचे विषारी विचार यांनी त्याला आतल्या आत पोखरण्यास सुरुवात केली. त्याने मांत्रिकाची भेट घेण्याचे ठरविले. वाण्याच्या बायकोचे दिवस आता पूर्ण होण्याच्या बेतात होते. त्याच्या मनात काय खदखदतंय याची त्याच्या बायकोस जराही कल्पना नव्हती. गावातील सुईण रोज वैदुबुवासोबत वाण्याच्या घरी नाडीची आणि ओटीपोटाची स्पंदनं ऐकण्यास येत असे. वैदुबुवा चाटण तयार करुन वाण्याच्या बायकोला देत. वाण्याचे व्यापारात लक्ष असणे स्वाभाविक होते. मात्र, संसारातले उडालेले होते. तरीही मांत्रिकाचे म्हणणे खोटे असेल अन् पुत्रकामेष्टी यज्ञाचीच फलप्राप्ती असेल असेही त्याला गर्भवती पत्नीकडे पाहताना वरचेवर वाटत असे. सुईणबाई घरातून वाण्याच्या दुकानात आली. 'शेठजी, आता आज-उद्या वेळ भरल बगा. आमची बिदागी घेण्याची वेळ आलीय. ह्यावेळी कोणाला नाराज करु नका बरं!' वाण्यानं चेहऱ्यावर बळेच स्मित आणीत, 'बरंय, मिळेल मनासारखं!' म्हटलं आणि सुईण घरी गेली.

त्या रात्रीला महादेव वाण्याच्या पत्नीला प्रसवपिडा सुरु झाल्या आणि वाण्याने वैदुबुवा तसेच सुईणीला पाचारण केले. पहाटेपर्यंत वाण्याच्या बायकोची सुटका झाली. स्वच्छ रेशमी वस्त्रात बाळाला गुंडाळून सुईणीने वाण्यासमोर धरले. 'बघा, अगदी साधुमहाराजांसारखा तेजस्वी आहे. कर्तृत्ववान निपजेल.' तिचे बोल वाण्याच्या पुत्रप्राप्तीच्या आनंदावर विरजण टाकणारे ठरले. मांत्रिकाचे विषारी विचार साधुमहाराजंवरील श्रध्देऐवजी संशयात बदलले होते. वाण्याने गळयातील मोतीहार सुईणीला भेट दिला तर वैदुबुवाला शंभराची नोट दिली. ते नवजात अर्भक हाती घेतले. तडक बायकोच्या बिछान्यापाशी आला. 'हे बघ, बाळाला माझा नाही तर त्या गोसावडयाचा चेहरा आहे. सुईणबाईपण हेच म्हणाली. बोल कधी खाल्लेस शेण?' महादेव वाणी आता पूर्णपणे बदलला होता. त्याला स्वत:चे मूल समजेना ना पत्नी. तो संशयाने बेभान झाला. त्याची बायको हमसाहमशी रडू लागली. पुत्रप्राप्तीचा तिचा आनंदच त्याने हिरावून घेतला. त्याच दिवशी ती ओली बाळंतीण आपल्या एका दिवसाच्या लेकरासोबत माहेरी शिरगावला भावांकडे निघाली.

--------#########--------

वाणी इकडे मांत्रिकाला भेटला. एव्हाना गावात शेठजीला मुलगा झाला ही वार्ता सर्वत्र पसरली होती. साधुमहाराजांना या बातमीची कुणकूण नव्हती. त्यांचा नदीच्या संगमावरील गेल्या दहा महिन्यांचा दिनक्रम अव्याहत सुरु होता. मांत्रिकाच्या सोबतीने वाण्याने साधुमहाराजांची हत्या करण्याचा डाव आखला. पहाटेच्या सुमारास साधुमहाराज नदीमध्ये सचैल स्नानास उरतले की लोखंडी तीक्ष्ण धारदार पंजांनी त्यांच्या शरीराचे तुकडे करायचे. पण तत्पूर्वी त्यांच्या पापाचे पाठे त्यांच्यासमोर वाचायचे. वाण्याला त्याची बायको माहेरी गेल्याची जराही पर्वा नव्हती. मांत्रिकाने त्याच्या मनामध्ये पेरलेले विष आता फळेही विषारीच देऊ पाहात होती. मांत्रिकाने अणुकुचीदार लोखंडी पंजे असलेली चार हत्यारं आणली. रात्री वाण्यानेही मांत्रिकासोबतच मदिरापान केले. पहाटे डाव साधायचाच, हा खुनशी विचार घेऊन ते नदीच्या संगमाकडे रवाना झाले. अद्याप आकाशात पहाटेची लालिमा पसरली नव्हती. मात्र, साधु महाराज नदीच्या पात्रात उतरले होते. मांत्रिक आणि महादेव वाणी दबकत-दबकत नदीच्या पाण्यात हळूच शिरले आणि पाण्याखालूनच दोघंही साधुमहाराजांच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. मांत्रिक आता अगदी जवळ पोहोचत असताना वाण्यामध्ये सद्सद्विवेक बुध्दी जागी होऊ पाहात होती. मात्र, तेवढयात मांत्रिकाने पूर्वेकडे तोंड करुन आपल्या हातातील अणुकुचीदार लोखंडी पंजे खुपसले आणि साधुमहाराज वेदनेने कळवळले. तेव्हा मांत्रिकही ओरडला 'शेठजी बगतो काय? तु बी खुपस ते पंजेऽऽ!' त्यासरशी वाण्यालाही त्वेष चढला, 'गोसावडयाऽऽ! पुत्रकामेष्टी काय? माझ्या ---- माझी बाई भोगलीस अन् तुझ्या चेहऱ्याचं मूल माझं म्हणू ----- वाण्यानंही त्याच्या हातातील लोखंडी पंजे खुपसले. साधु महाराजांना त्या घावांपेक्षा वाण्याचे ते बोलणे अधिक वेदनादायी वाटले. त्यांनी घायाळ अवस्थेतही म्हटले, 'शेठजी, यज्ञाला नाव ठेऊ नका आणि बायकोला वाईट म्हणू नका. तुम्हाला संतान प्राप्ती होती तिच ही! मांत्रिकाच्यापासून दूर रहा. त्याने तुमच्या सारासार विवेकावर सैतानी ताबा मिळविलाय!' वाण्यानं काही ऐकलं नाही. त्याने पुन्हा पंजाने साधुमहाराजांवर घाव घातले. आकाशात सूर्यदेवाच्या आगमनाची चाहूल देणारा लालिमा पसरला असतानाच नदीच्या पात्रातही महाराजांच्या रक्ताचा लाल रंग दिसू लागला. साधु महाराजांना अंत दिसला. त्यांनी अखेरचे बोलण्यास प्रयत्न केला. 'शेठजी, जे समजून तु माझ्या जीवावर उठलास, तो गैरसमज तुझ्या वंशात खरा ठरेल. तुझ्या कुळात जन्मणाऱ्या स्त्रिया व्यभिचारी होती. त्या केवळ पुत्रप्राप्तीसाठीच! जो पुत्र तुझा पुत्रकामेष्टी यज्ञाच्या फलप्रापत्यर्थ जन्मला त्याच्या पोटी तु जन्म घेशील. तु त्यावेळी निपुत्रिक राहशील. या यज्ञापुत्राच्या मुली, पत्नी या साऱ्या व्यभिचारामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण ठरतील. तर त्याच्या पोटी तुझा जन्म झाल्यानंतर तुझ्या कुळाचा सर्वनाश करण्यास मी परकाया प्रवेश करीन. तोवर हा देह तु जीर्ण केलास म्हणून मी तो सोडेन:

नैनं छिन्दत्नि शस्त्रणि नैनं दहति पावक:।

न चैनं क्लेदयन्त्यपो न शोषयति मारुत:॥

वासांसि जीर्णानी यथा विहाय। नवानि गृह्य ति नरोऽ पराणि॥

तथा शरीराणि विहाय जीर्णान्य न्यानि संयाति नवानि देही॥'

मांत्रिक आणि महादेव वाण्याने साधु महाराजांच्या शरीराचे एवढे तुकडे केले की ते पाण्यासोबत वाहूनही गेले.

------#####--------

सुबोध आणि क्षिप्रा दोघेही कॉलेजच्या गार्डनमध्ये गप्पा मारीत बसले होते. त्यांचे हे रोजचे तासन्तास बसणे आता कोणासही आश्चर्यकारक अथवा आपत्तीजनक वाटत नसे. 'एक सुबु, आता हे वर्ष संपलं की आपण दोघे वगवेगळया कॉलेजात तरी जाणार किंवा नोकरी-व्यवसायात गुंतणार. मग आपली काही रोज भेट होणार नाही. पण आठवणी येतीलच नाही!' क्षिप्राचे अचानक हे भविष्यकाळातील वियोगाचे बोल ऐकून सुबोधने चट्दिशी उत्तर दिले, 'आठवण यायला आधी विसरावं लागतं आणि मी..... ए, क्षिप्रा आय लव्ह यु:' क्षिप्रा वाचळली, 'व्हॉट? सुबुऽऽ अरे, काय बोलतोस हे?'

'इट इज थ्रु माय हार्ट क्षिप्रा.' आय कान्ह मिस यु इन फ्युचर!' 'सुबु, मैत्रिण म्हणून ठिक आहे. पण पुढे संपूर्ण आयुष्याचा निर्णय! असा अचानक बोलून द ाखविणं धाडसाचंच नाही काय? यापूर्वी तीन वर्षात कधी तुझ्या बोलण्यातून जाणवलं नाही. मला तुला दुखवायचं नाही. पण तु असा विचार करुनही नकोस आणि बोलुही नकोस. फार फरक आहे तुझ्या अन् माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीत. तु मध्यमवर्गीय असून सुसंस्कारित तरीही केव्हाही खर्च करण्याची मानसिकता असलेला आणि आमचे कुटुंब चांगले शिकलेले, श्रीमंत असूनही संस्कारांचा पत्ता नाही आणि उगीचच पैसा वाचविण्याचे नव्हे इतरांना बुडवून स्वत:चा फायदा करणारे. त्यात आपल्या मैत्रीखेरीज तुला माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी कुठे माहिती आहे? क्षिप्रा सुबोधला त्याच्या अचानक व्यक्त झालेल्या प्रेमभावनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करु लागली. 'येथून पुढे मी माझे शिक्षण थांबवितो. नोकरी पत्करतो. तुला पुढे शिकायचे आहे ना? तु शिक. त्यानंतर आपण दोघे लग्न करु. मग तुझ्या अन् माझ्याशिवाय बाकी कुटुंबियांचा प्रश्न तरी कोठे येतो? सुबोधने थोडक्यात भावी जीवनाची रुपरेषा तिच्यापुऐ मांडली.

तसं नाही रे सुबोध. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकायचीच? मग ऐकच. आमचं कुटुंब कोकणातलं. आमचे आजोबा व्यापारी महाहादेव शेठ. त्यांना माझे वडील हे नवसारे झाले. त्यानंतर माझी आजी वडिलांना घेऊन माहेरी आली. वडिलांच्या मामांनी माझ्या वडिलांचे शिक्षण पूर्ण केले. आजोबा व्यापारानिमित्त गेले ते आलेच नाहीत. म्हणून आजीने वडील लहान असतानाच मामांच्या स्वाधीन करुन दुसरे लग्न केले. तिला दोन मुली झाल्या. पण तिचे दुसरे मिस्टर वारले आणि तिच्या दिराने तिच्याशी संबंध ठेवले म्हणून आणखी एक मुलगी झाली. इकडे वडील डॉक्टर झाले तेव्हा त्यांना समव्यावसायिक डॉक्टर महिलेसोबत लग्न करायचे होते. पण मोठया मामांनी आपण शिकविले म्हणून स्वत:च्या मुलीशी लग्न करायचा आग्रह धरला. म्हणजे माझ्या आईसोबत बाबांना आई अगदी लहानपणापासून परिचित असल्याने ते नाखुष होते. पण मग त्यांनी लग्न केले. त्यानंतर मोठया बहिणीनंतर दादाचा जन्म झाला. मग आईचा आणि मी शेंडफळ. आईचं काय चुकलंय कोणास ठाऊक? बाबा कायम तिच्यासोबत भांडतात. त्यांचं लग्नच जिथं नाराजीतून झालंय तिथं संसारात कुठे एकोपा दिसणार? आमचं बालपण हे तसं अनाथासारखंच गेलं. ताई, दादा आई आणि आता मी चौघे होस्टेलमध्ये राहून घरापासून दूर शिकलो. माईचं दोघांवर प्रेम होतं. त्या दोघांच्या ते लक्षात आलं. दोघांपासून तिला दूर राहायचं नव्हतं. शेवटी दोघांनीही तिचा नाद सोडला. तिने आत्महत्या केली. ताईलाही शाळेतील कारकूनासोबत लग्न करायचं होतं. बाबांनी मामांना ही बाब सांगितली. तेव्हा मामांनी म्हणजे वडीलांचे मामा, आई बाबा बरं! त्यांनी ताईचे लग्न त्यांच्या ओळखीच्या जातीतील तरुणाशी लावलं. दादाचंही गुजराथी मुलीसोबत प्रेम होतं. बाबांनी त्याचं जातीतल्या डॉक्टर मुलीशी लग्न लावून दिलं आणि मी. मला काही कळत नव्हतं तेव्हापासून एका टेम्पोवरचा क्लिनर माझ्यावर प्रेम करतोय. मला कोणाला तोडता येत नाही. तो माझ्या वर्गात होता. त्याने पानाची टपरी सुरु केली. नोकरीचे प्रयत्न केले. शेवटी क्लिनर झाला. मी काही त्याच्याशी लग्न करुन शकत नाही आणि तुझ्याशी करायचं म्हटलं तर बाबा आणि आई जातीतला मुलगा शोधायला सुरुवात करतील आणि माझं पुढचं शिक्षण अर्धवट राहिल. प्लीज, तु हा विचार सोडून दे. अरे तुला तुझ्या जातीत माझ्यापेक्षा सुंदर आणि शिकलेल्या मुली मिळतील... क्षिप्रा केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित नकार न देता पर्याय सुचवित असल्याचे पाहून सुबोधने निग्रहपूर्वक विचारले. 'डोन्ट यू लाईक मी? डोन्ट यू लव्ह मी? क्षिप्रा'

'अरे तसं नाही रे मला तु खूप आवडतोस आणि माझं तुझ्यावर प्रेमही आहे पण लग्न हा विचार मी आता तरी करु शकत नाही. मला समजून घे. आपली मैत्रीच ठिक आहे.'

क्षिप्राच्या बोलण्याने सुबोध चवताळला. 'मग मैत्री तरी कशाला? मी मैत्री हद्द ओलांडून दृढ अशी प्रेमभावना व्यक्त केली अन् तु ती अव्हेरलीस तर मी तुझ्यासोबतची मैत्री नाकारतो. कारण मी आता तुझा प्रियकर आहे. मित्र नाही. भले तु माझे प्रेम नाकारले असलेस तरी प्रेमभावना मनात ठेऊन मी मैत्री निखळ करु शकत नाही. गो अवेऽऽ! गेट लॉस्ट!'

त्या आवेशात भावूक स्पंदने होती. डोळयात साकळलेले अश्रू आता गालावर होते. क्षिप्रा अधिकच गोंधळली. तिला सुबोधचा प्रेमभंग आपल्याकडून झालाय नव्हे तर काही क्षणापूर्वी त्याच्या मैत्रीच्या वेलीवर उमललेले प्रेमाचे सुंदर फुल आपण कुस्करुन टाकत आहोत, अशी अपराधीपणाची भावना झाली. तरीही ती त्याचे प्रेम स्विकारुन त्याला भावी काळात उद्भवणाऱ्या कौटुंबिक वादळाची झळ पोहोचू द्यायची नाही या विचारात गढली होती. तोही डोळे रुमालात तर चेहरा दोन्ही तळहातांनी झाकलेला होता. क्षिप्रा अंतर्मुख होऊन तेथून उठून गेली. सुबोधचे तिच्याकडे लक्षच नव्हते.

'सुबोध इनामदार दोन दिवस कुठाय क्षिप्रा?' त्याच्या मित्राने तिला सहज विचारले. 'अरे, मी इथं होस्टेलमध्ये राहतेय. मला कसे समजणार? तुच सांग तुला भेटला तर क्षिप्रा विचारत होती.' तिने सहज उत्तर दिले खरे पण तो येत नाही यास आपण कारणीभूत आहोत याची जाणीव तिला मनोमन सतावू लागली.

काही दिवसांनंतर एक दाढीधारी तरुण क्षिप्राच्या कडेने चेहरा दाखविण्याचे टाळत निघून गेला. क्षिप्राला क्षणभर तो तरुण परिचित वाटला आणि दुसऱ्याच क्षणाला तिने साद घातली. 'सुब्बुऽऽऽ!' तो तरुण भराभर पावले टाकीत निघून गेला. कॉलेजमधील तरुण तरुणी कोणी साद घातली म्हणून इकडे तिकडे पाहू लागले आणि क्षिप्राने खाली मान घालून क्लासरुममध्ये प्रवेश केला. तो तरुण सुबोधच होता अशी खात्री तिला तो चेहरा आठवताना पटली आणि तिने त्याचा शोध घ्यायचे ठरविले. लायब्ररी, कॅन्टीन, जिम, कॉमन रुम सगळीकडे धुंडाळले आता फक्त गार्डन. तिची पावले गार्डनकडे वळली. तेथे अनेक जोडपी झुडुपालगत बसली होती. तर काही टोळकी गोल रिंगण करुन गप्पा-टप्पा करीत असताना एकटीनेच भिरभिरत्या नजरेने तिने सुबोधचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिकडे एका आंब्याच्या झाडाखाली उताणा होन चेहऱ्यावर वही घेऊन पहुडलेला तरुण तिला दिसला. ती तेथे गेली. उंची, अंगकाठी तिच म्हणजे सुबोधच असा विचार करुन तिने खात्री पटल्यावर त्याच्या शेजारीच बस्तान मांडले. हळूच त्याच्या वहीवर चेहरा नेत हलकेच तिने वही बाजुला सारली. तो सुबोधच होता. अचानक वही सरकल्याने तो ताडकन उठण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर चेहरा झाकलेल्या क्षिप्राचे ओठ त्याच्या ओठांसमोर आले. क्षिप्रा कुजबुजली, 'आय लव्ह टु सुब्बु!' आणि त्याने तिचे कुजबुजणारे ओठ स्वत:च्या ओठांनी बंद केले.

---------#########--------

वर्षभरात सुबोध आणि क्षिप्राने गांधर्व पध्दतीने विवाह केला. तिला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सुबोधने नोकरी करुन पैसा उभा केला. क्षिप्राचे वडील तेथे प्रवेशासाठी तिच्यासोबत गेले तेव्हा ऍडमिशन लिस्टमध्ये क्षिप्राचे नाव पाहून त्यांना आपली मुलगी मेरीटनुसार प्रवेशास पात्र ठरल्याचे वाटले. त्यांनी क्षिप्राच्या होस्टेलची व्यवस्था केली. सुबोध येथे मात्र नोकरी करुन पैसा उभा करायचा आणि क्षिप्रासोबत संसार थाटायचा यासाठी प्रयत्नशील होता. त्याने आर्थिक बाजू भक्कम केली आणि क्षिप्राला तिच्यासाठी घडविलेले मंगळसूत्र दाखविण्यासाठी तिच्या होस्टेलमध्ये गेला. तेथे त्याच्या कॉलेजचा एक विद्यार्थी भेटला. 'अरे सुबोध, बॅड न्यूज क्षिप्राचे इथं तिच्या वडीलांनी लग्न ठरवलंय. संदीप चिंगळे नावाचा साबण व्यापारी आहे. इथं तो गेल्या महिन्यापासून तिला भेटायला रोज येतो. आता येईलच. तो बघ स्कूटरवरुन येतोय. थोडा वेळ तो क्षिप्राचे लेक्चर संपण्याची वाट पाहतो. मग ती त्याला भेटते.' सुबोध त्यांचं बोलणं सुरु असतानाच संदीप चिंगळेच्या दिशेने गेला. 'हॅलोऽऽ! मी सुबोध इनामदार. क्षिप्रासोबत माझं लग्न झालंय!' सुबोधने पहिल्याच वाक्यात दिलेला परिचय ऐकून संदीप गोंधळला. 'मीऽऽ.... त्याला बोलून न देताच सुबोध म्हणाला, 'क्षिप्राचा स्वभाव मला माहिती आहे. तिच्या कुटुंबियांची जातीत लग्न करण्याची मानसिकतादेखील मी ओळखून आहे. तुम्हाला यंदा कर्तव्यच असेल तर मी चांगल्या मुलीचं नाव सुचवू शकतो. गीता. ती तुमच्याच जातीतील आहे. तुम्ही हा प्रयत्न थांबला.' संदीप निरुत्तर झाला. 'ठिक आहे. गीता की कोण म्हणालात तिचा पत्ता द्या.' सुबोधने त्याला गीताचा पत्ता सांगितला. संदीप तेथून निघून गेला. क्षिप्रा काही वेळातच क्लासरुमबाहेर आली. सुबोधला अचानक पाहताच ती गोंधळली. संदीपही आला असेल म्हणून तिने सुबोधला पाच मिनिटांनंतर भेटू, असे हातानेच खुणावले. सुलबज्ञोधने तिचा दंड पकडला. 'अगं, संदीपला मी घालवलं. तो आता गीतासोबत लग्न करणार आहे. आठवतेय ती इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट, तुझी ज्ञाती भगिनी!' क्षिप्रा काहीशी बावली. 'पण...... सुबु माझ्या घरच्यांना संदीप काय सांगेल? तु पत्र लिही माझ्या बाबांना. तो तुझा प्रस्ताव झिडकारतील. तुझा अपमान करतील. आता ठरलेले लग्न मोडले तर ते माझे शिक्षणही बंद करतील. थांब आपण तिकडे कट्टयावर बसून विचार करु या!'

क्षिप्रा आणि सुबोध कट्टयाच्या दिशेने चालत जात असताना सुबोधने अचानक विचारले, 'क्षिप्रा, तु आपल्या गांधर्व विवाहाबाबत संदीप आणि तुझ्या बाबांना काहीच कधी सांगितलं नाहीस? आश्चर्य वाटतंय मला! तु तुझं संदीपसोब लग्न ठरलंय हेदेखील मला सांगितलं नाहीस.' 'हे बघ, मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. मी पहिली ही अट घातली. त्यामुळे एप्रिलमध्ये माझी परिक्षा झाल्यावरच लग्नाची घाई सुरु होणार हे नक्की झालं होतं. त्या दरम्यान मी तुला, संदीप आणि बाबांना सांगणार होते.' क्षिप्राने खुलासा केला. 'पण आताच तु संदीपला सांगितल्यानं खूप घोळ होणार आहे. असं कर, आता बाबांना तु एप्रिलमध्ये माझ्याशी काहीही करुन लग्न करणार आहे अशी धमकी देणारं पत्र लिही म्हणजे ते एप्रिलपर्यंत माझं लग्न होणार नाही म्हणून निश्चिंत राहतील. कदाचित ते तु तोपर्यंत गाफिल राहशील, असाही अंदाज बांधतील.'

'पण क्षिप्रा त्याचे दुष्परिणाम काय होतील माहितेय? अगं ते पोलिस कम्प्लेंटही करतील माझ्याविरुध्द,' सुबोधने भिती व्यक्त केली.

'असं कर, आपल्यातले सर्व संबंधही त्यांच्यासमोर उघड कर. म्हणजे ते माझ्या आणि कुटुंबाच्या अब्रुखातर तुझ्याविरुध्द कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास कचरतील.' क्षिप्राने जणू हे पूर्वीपासून ठरविल्याप्रमाणे सांगितले.

------#####------

क्षिप्राचे बाबा सुबोधच्या घरी पत्रं घेऊन आले. सुबोधच्या वडिलांनी ती पत्रं वाचली. त्यांनी सुबोधचे क्षिप्रावर क्षिप्रावर प्रेम असल्याचे तिच्या वडिलांना सांगितले. दोघांचे लग्न लावण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांना सांगून स्वत:ची अनुकुलता दर्शविली. क्षिप्राच्या वडिलांनी यावेळी आपला मुलगा व मुलगी तसेच पत्नीदेखील या विवाहाच्या विरोधात असून जातीतून क्षिप्राला मागणी आहे, असा खुलासा केला. सुबोधच्या वडिलांनी तसे केल्यास आमचा मुलगा आमच्या आज्ञेबाहेर जाईल आणि दोन्ही कुटुंबांना या प्रकरणाचा त्रास होईल, असे या पत्रांवरुन जाणवत असल्याचे सांगितले. एकूण प्रकरणाचा सांगोपांग विचार करुन दोघांच्या वडीलांनी क्षिप्रा आणि सुबोधचा वैदीक पध्दतने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सुबोधच्या ऑफिसमध्ये त्याच्या टेबलावरील फोनची घंटी वाजली. सुबोध एका प्रसिध्दीमाध्यमाच्या कार्यालयात नोकरी करीत असल्याने त्याने प्रथम त्या कंपनीचे नाव घेऊन, 'सुबोध इनामदार, वृत्त विभागातून बोलतोय!' पलिकडून आवाज आला, 'हो का मिस्टर इनामदार! मी मिसेस इनामदार बोलतेय! ए तुझी क्षिप्रा' सुबोध उडालाच! 'अगं तु!' क्षिप्रा म्हणाली, 'अरे बाबांचा फोन आला होता. ते तुझ्या घरी तुझी पत्रं घेऊन गेले होते आज. त्यांनी आणि तुझ्या वडीलांनी आपलं पुन्हा वैदीक पध्दतीनं लग्न लावायचं ठरवलंय. आहे की नाही गुड न्युज? माझा फर्ॉम्युला सक्सेसफुल झालाय बरं!' सुबोधला काय ऐकतोय यावर विश्वासच बसेना. तो तिला म्हणाला, 'डार्लिंग चेष्टा नको. खरं काय ते सांग!' तिने तिच्या बाबांनी सांगितलेली सर्व हकीगत त्याला फोनवरच सांगितली. संभाषण संपलं तरी सुबोधला इतक्या सहज लग्नाचं ठरलं यावर विश्वासच बसेना. घरी गेल्यावर त्याच्या आई-वडीलांनी त्याला क्षिप्राच्या वडीलांची मानसिकता कशी आहे? हे सांगून एप्रिलपर्यंत सबुरीचा सल्ला दिला. त्यानंतर क्षिप्राची त्याच्या घरी त्याला, त्याच्या आईला पत्रेही येऊ लागली. कधी-कधी त्याच्या ऑफिसमध्ये तिचे फोनही खणखणू लागले. सुबोध शुक्रवारी विकली ऑफ मिळताच तिच्या अध्यापक महाविद्यालयात तिला भेटण्यास जाऊ लागला.

------########--------

क्षिप्राची परिक्षा संपली आणि सुबोधसोबत तिच्या लग्नाची तयारी सुरु होईल अशी तिला अपेक्षा वाटली. मात्र, भाऊ आणि त्याची बायको वेगवेगळे राहू लागले आणि वडीलांचे अन् भावाचे मतभेद विकोपाला गेले म्हणून भाऊ वेगळा राहात होता. बहिणीने संदीप चिंगळेचे स्थळ सुचविले होते. मात्र, ते लग्न मोडल्याने तीदेखील क्षिप्राच्या लग्नाला येणार नव्हती. आईदेखील परजातीीतहील विवाहास राजी नव्हती पण वडीलांच्या आग्रहामुळे ती लग्नास अनुकूल झाली होती. क्षिप्राने एक पत्र लिहून सारी वस्तुस्थिती सुबोधला कळवित मंगळसूत्रापासून जेवणावळीपर्यंतची सर्व तयारी करण्यास सुचविले. सुबोधला संभाव्या परिस्थितीची जाणीव झाली आणि त्याने लग्नाची तयारी सुरु केली.

-------#########---------

सुबोध आणि क्षिप्राचे वैदीक पध्दतीने लग्न झाले. कोणतेही विघ्न आले नाही. मात्र, तिसऱ्याच दिवशी सुबोधच्या वडीलांना स्नायुंचा आजार बळावल्याने पुण्यामध्ये हलवावे लागले. तेथे महिनाभरात उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. सुबोधवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. त्याने मोठया हिंमतीने संसार सावरला. क्षिप्रानेही त्याला साथ दिली. लग्नानंतर क्षिप्राच्या माहेरच्यांनी तिला भेटण्याचे टाळले. एके दिवशी अचानक क्षिप्राला तिच्या वडीलांचे पत्र आले. तिची सर्टिफिकेटस् आणि सामान घेऊन जाण्याचे त्यांनी पत्रात लिहिले होते. क्षिप्रा माहेरी गेली आणि संध्याकाळीच घरी परतली. सुबोधला सोबत आणण्याचे टाळण्यास सांगितल्यानुसार क्षिप्राने त्याला सोबत नेले नव्हते. तिला माहेरी राहण्याचाच नाही तर जेवणाचाही आग्रह कोणी केला नाही. त्यामुळे तिला वाईट वाटले. मात्र, सुबोधने आईला आधीच लग्न मान्य नव्हते; त्यात आणखी ती एकटी घरात आणि वडील दवाखान्यात. मग कसा आग्रह करणार ती? अशी क्षिप्राची समजूत घातली.

लग्नानंतर एक महिन्याच्या अंतराने वडील गेल्याने सुबोध त्याच्या कुटुंबियांची मने सांभाळीत क्षिप्रालाही मानसिक आधार देत नोकरी जबाबदारीने करीत होता. त्याचे प्रसिध्दी माध्यमांमध्ये प्रामाणिक, मेहनती, अभ्यासू तरीही धाडसी व्यक्तिमत्व म्हणून चांगलेच नाव झाले होते. काही शत्रूही त्यामुळे निर्माण झाले होते. बिल्डर्स, पोलीस निरिक्षक, काही राजकीय व्यक्ती त्याच्या विरोधात असूनही कोणासही सुबोध तशी संधी देत नव्हता. वर्षभर घरी राहिल्यानंतर क्षिप्राने त्याच्याकडे नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. सुबोध तिला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच तिचे वडील वारल्याचा फोन आला. सुबोध तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. तिच्या वडीलांच्या पार्थिवाला तिच्या बहिणीच्या मिस्टरांप्रमाणेच सुबोधनेही खांदा देऊन कर्तव्य बजावले. क्षिप्राचा भाऊ, बहिण, आई या दु:खद प्रसंगातही सुबोधसोबत अबोला धरुन होते. सुबोध सासऱ्यांचे अंत्यविधी झाल्यानंतर क्षिप्राला घेऊनच घरी निघाला. तिसऱ्या दिवशी आणि सावडण्याच्या विधीला तो गेला तेव्हा क्षिप्राला तेथे राहण्याचा आग्रह झाला आणि तो एकटा घरी परतला. कार्याचे विधी होणार असल्याने तो पुन्हा सासरी गेला आणि येताना क्षिप्राला सोबत घेऊन आला. प्रवासात क्षिप्रा म्हणाली, 'सुबोध अरे बाबांनी आत्महत्या केली. झोपेच्या गोळया घेतल्या. दादा डॉक्टर असूनसुध्दा त्यांच्यावर उपचार केले नाहीत.' ती रडू लागली. सुबोधने तिचे डोके स्वत:च्या खांद्यावर ठेवीत थोपटले. 'काय झालं ते शांतपणे सांग रडू नकोस.'

'बाबांनी गेल्या महिन्यात ज्योतिषाला पत्रिका दाखविली होती दादाची. दादाला मुलगा होणार नाही असे ज्योतिषी म्हणाले. वहिनीची डिलिव्हरी झाली आणि पहिली मुलगी झाली. हे पण मला कळविलं नाही रे दादाने. बाबांनी दादाला मुलीचं बारसं थाटात करायचा आग्रह धरला. बारसं झालं आणि दादाने बाबांसोबत भांडण उकरुन काढलं. वहिनीने पण तिचं मंगळसूत्र दादाच्या अंगावर फेकलं. तसा दादा चिडून बाबांच्या छातीवर बसला. शिव्या देत त्यांना मारहाणही केली. बाबांना मानसिक धक्का बसला. पाहुण्यांच्या देखत हा प्रकार झाल्यामुळे त्यांनी रात्री झोपेच्या गोळया घेतल्या. आईच्या लक्षात आल्यावर तिने दादाला सांगितलं. पण दादानं लक्षच दिलं नाही. त्यांना शेजाऱ्यांनी मुंबईला हलविलं. पण वाटेतूनच त्यांची बॉडी परत आणावी लागली. तिसऱ्या दिवशी तु मला ठेऊन गेलास ना, तेव्हा दादाने वकिलांना बोलावून प्रॉपर्टीची वाटणी करण्याची बैठक घेतली. नवीन घर स्वत:च्या नांवे ठेऊन आलीला जुन्या घरात रहायला सांगितले. आई रडू लागली. शेवटी ताईने तिला तिच्याकडे नेण्याची तयारी दाखविली. तेव्हा दादाने आईला सोबत ठेवण्याची तयारी दाखविली. मात्र, तिचा खर्च जुनं घर भाडयाने देऊन भागविन असं सांगितलं. दादा खूपच दृष्ट आहे ना रे?' क्षिप्राने तिचं मन मोकळं केलं. सुबोधने तिला थोपटलं आणि समजावलं, 'आपल्याला आपलं घर आहे ना? त्या घराचा विषय सोडून दे. तिथलं काहीच नको आपल्याला. मान नको, धन नको आणि अपमानही नको. आपल्या छोटया विश्वात आपण सुखी राहु या!'

-------#####-------

क्षिप्राला सुबोधने त्याच्या ओळखीतून शिक्षिकेची नोकरी लावली. नोकरीनिमित्त ते दोघे घरातून वेगळे झाले तरी दर आठवडयाला ते त्यांच्या घरी येत असत. क्षिप्राला नोकरी पक्की होईपर्यंत मूलबाळ नको होतं म्हणून दोघांनी परस्पर सहमतीने तसा निर्णय घेतला. तब्बल चार वर्षानंतर तिची बहिण, भाऊ व आईने तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. क्षिप्रा आता माहेरी ये-जा करु लागली. सुबोधला नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात जाऊन राहावे लागल्याने त्याने क्षिप्राला त्याच्या घरी ठेऊन तेथेच नोकरी मिळवून दिली. मात्र, त्यामुळे दोघांमध्ये दुराव्यातून गोडवा होण्याऐवजी तिच्या नातेवाईकांनी तिला सुबोधविरुध्द चिथाविण्यास आणि आपुलकी दाखविण्यास सुरुवात केली. सुबोध या प्रकारांपासून अनभिज्ञ होता. क्षिप्राही तो आठवडयातून एकदा घरी येत असल्याने त्याला माहेरच्या लोकांबाबत फारसे सांगत नसे. अशातच तिने एकदा दादाने सुटीत शिर्डीला जाण्यासाठी माहेरी बोलावले असल्याचे सुबोधला सांगितले. सुबोधने तिला परवानगी दिली. मी नोकरीच्या ठिकाणी असताना अचानक क्षिप्राचा पुण्यातून फोन आला. 'सुबोध, अरे मी प्रेग्नंट आहे आणि मला नोकरीत कायम होईपर्यंत हे मूल नकोय. प्लीज तु पुण्याचा ये. दादा, ताई, वहिनी, आई आणि मी इथे एका लॉजवर आहोत. हा तिसरा महिना आहे आताच ऍबॉर्शन केलं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे आणि मला नोकरीत पर्मनंट झाल्याखेरीज मूल नकोय. तु तातडीने ये.' सुबोधला ही गुड न्यूज अशी बॅड न्यूज होऊन ऐकावी लागल्याचा धक्का बसला. मात्र, तो तसाच पुण्याला निघाला. तिथे पोहोचल्यावर क्षिप्राच्या दादा, ताई आणि वहिनी या तिघांनी त्याला घेरले. 'क्षिप्राला मूल नकोय मग कशासाठी ते पोटात ठेवायचं उद्या तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं मग सगळी जबाबदारी तुमची राहील,' दादाने सुबोधला सुनावलं. 'आम्ही तुमच्यावर केस करु.' ताईने धमकावलं. 'तसं ऍबॉर्शन काही सिरीयस बाब नाही. अनेक विवाहित जोडपी करतात.' क्षिप्राच्या डॉक्टर वहिनीचा अनाहूत सल्ला.

'मी हा निर्णय एकटा घेऊ शकत नाही आणि क्षिप्राही नाही! माझ्या कुटुंबियांनाही मूल हवं असेल तर परस्पर निर्णय घेणे वाईटपणा आणणारं आहे. मी येथे काही सांगू शकणार नाही. क्षिप्राला घरी नेतो. मागाहून शांतपणे विचार करु' सुबोधने शांतपणे उत्तर देत त्यांच्या हेतूला हरताळ फासला.

--------######-------

सुबोध क्षिप्राला घेऊन एकटाच जाऊ नये म्हणून दादानं ताई आणि आईलाही सोबत पाठवून स्वत: वहिनीसोबत पुण्यात मुक्काम ठोकला. क्षिप्राने काहीही करुन ऍबॉर्शन करायचेच असा निर्धार केल्याने शेवटी काही दिवसांनी सुबोधला तिला सहमती दर्शवून स्वत:च्या कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागली. क्षिप्राने ऍबॉर्शन केल्यानंतर सुबोध अधिकच हळवा झाला. नोकरी निमित्त क्षिप्रापासून दूर राहावे लागत असल्याने त्याच्या दु:खाला आवर घालायलाही तेथे कोणी नसे. इकडे दादा, ताई व आई क्षिप्राला रोज फोन करुन आपुलकी दाखवू लागले. हळूहळू ती त्यांच्या कह्यात जाऊ लागली. सुबोध आठवडयाचा पाहुणा असल्याची संभावना ती करु लागली. एके दिवशी ती अचानक माहेरी गेली. तेथून सुबोधला फोन केला. 'सुबोध, माझी वहिनी दुसऱ्यांना बाळंत झाली. मी घरी न सांगताच परस्पर इकडे माहेरी आलेय. संध्याकाळी परत घरी जाईन. मात्र उद्या परत येईन आणि बारशापर्यंत इथेच राहिन. तु सुटी घेऊन घरी आईंकडे लक्ष दे जरा. मधून-मधून तुला घरी फोन करीन मी.' तिने फोन ठेवल्यानंतर सुबोधला तिला माहेरचा ओढा अचानक लागल्याचे आश्चर्य वाटले. लग्नानंतरची काही वर्षे मुलगी कशी आहे? याची साधी चौकशीही न करणारे क्षिप्राचे माहेरवासी 95 क्रमांकाने लोकल कॉलसेवा उपलब्ध झाल्यामुळे तिला दररोज अर्धा-अर्धातास फोन करुन गप्पा मारु लागले, याचेही त्याला आश्चर्य वाटत होते. दोन दिवसांनी सुबोध घरी आला तेव्हा आईने क्षिप्रा बरेचसे सामान, कपडे, सर्टिफिकेटस्, दागिने घेऊन माहेरी गेल्याचे सांगितले. पण बारशापर्यंत राहायचे तर सर्टिफिकेटस् वगळता बाकी मोठी रसद बांधून नेणे आवश्यक होते असा विचार करुन सुबोध शांत बसला. संध्याकाळी त्याने क्षिप्राला फोन लावला; तेव्हा ती फोनवर आलीच नाही. तिच्या दादाने 'इथं फोन करु नका. तुमचा आमचा काही संबंध नाही,' असे सुनावले. त्याच्या मनात अजून आपल्या आंतरजातीय विवाहाचा राग असेल असे समजून सुबोध आता क्षिप्राच्या फोनची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशीही तिने सुबोधशी संपर्क साधला नाही. तिसऱ्या दिवशी पोस्टमन चक्क एक रजिस्टर पत्र घेऊन आला. सुबोधने पत्राचा मायना वाचण्यास सुरुवात केली. 'श्री. सुबोध इनामदार आमच्या अशिल क्षिप्रा सुबोध इनामदार यांनी सांगितलेल्या हकिकतीवरुन आपणास या नोटीशीद्वारे कळविण्यात येते की,....... या पत्राच्या शेवटी,...... आपण दोघांनी संयुक्तरित्या विवाह विच्छेदनासाठी अर्ज करावा. अन्यथा आमचे अशिलास त्यासाठी कोर्ट दरबार करावा लागेल व होणाऱ्या खर्चाची जबाबदारी आपणावर राहील! सुबोध हबकला. काय हा प्रकार? चक्क विश्वासघात! त्याने क्षिप्राला फोन लावला. तिने मला तिथं राहण्यास दादाचा आणि ताईचा विरोध आहे असे सांगितले. पण मी तुला घटस्फोट देणार नाही. या जन्मी तरी नाही. तु परत ये.' सुबोधचे निक्षून सांगणे होताच तिकडे क्षिप्राच्या दादाने फोन घेतला, 'अरे, तु काय नाही देणार! आम्ही घटस्फोट मिळवूच. पाहिजे तर तुझ्याविरुध्द खोटी पोलीस तक्रारही करु. तुला तुरुंगाची हवा खायला लावू!' हे ऐकताच सुबोध सून्न झाला. दुसऱ्या दिवशीच त्याला समजून आले की, क्षिप्रा, दादा, ताई आणि आई यांनी आपल्या विरोधातील एक बिल्डर, दारु दुकानदार तसेच पोलीस निरिक्षक यांच्यासोबत संगनमताने खोटी फिर्याद दाखल करुन आपणास अटक करुन तुरुंगात डांबण्याचे आणि तेथे घटस्फोटाच्या पत्रावर सही घेण्याचे षडयंत्र आखले आहे. सुबोध या विश्वासघाताने अंतर्मुख झाला. विचारांती त्याने स्वत:च पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याला अटक झाली. तेथून त्याला तीन दिवस पोलीस कोठडीमध्येही ठेवण्यात आले. सुबोध विमनस्क अवस्थेत मृतप्राय होऊन तेथे राहिला. जामिनावर घरी आल्यावर सुबोधला जीवनाचा कंटाळा आला आणि त्याने झोपेच्या गोळया घेतल्या. त्याची गात्रं शिथिल झाली. श्वास मंदावला. त्याच्या खोलीचा दरवाजा त्याने आतून बंद केला. बिछान्यावर शांतपणे पहुडला. डोळे जड झाले. पापण्या मिटू लागल्या. अखेरची घरघर सुरु झाली. डोळे मिटले आणि आश्चर्य... अचानक दिव्य प्रकाश त्याच्या डोळयांवर पडला.... शरीरात चैतन्य संचारले.... त्याला श्रीमद्भगवतगीतेतील

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा।

तथा देहान्तर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यती॥

हे सुभाषित ऐकू आले. हाक धीरगंभीर आवजात त्याच्या कानामध्ये, ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे स्थिर मनुष्य गोंधळून जात नाही. तुझी अवस्था अगदी महाभारतातील अर्जुनासारखी झाली आहे.

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणममिन्द्रीयाणाम्॥

अवाप्य भूमावसपत्नमृध्दं राज्य सराणामपि चाधिपत्यम॥

म्हणजे तुझ्या पंचेंद्रियांना शुष्क प ाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच तुला दिसत नाही. स्वर्गातील दिवसासारखे देवासारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करुनसुध्दा तुला तुझ्या शोकाचे निराकरण करता येणार नाही असे वाटू लागलेय. पण तु लक्षात ठेव, तुझ्या पत्नीने, मेव्हण्याने, मेहुणीने, सासुने तुझ्याप्रतीच नव्हे तर आपसातही नातेधर्माचे पालन केले नाही. पत्नीने तुझ्याशी विश्वासघात करुन पत्नीधर्म आणि येणाऱ्या बाळाला झिडकारुन मातृधर्माची अवहेलना केली आहे. मेव्हण्याने तुझ्या बायकोचा भाऊ या नात्याने तिचे शीलरक्षण करण्याऐवजी दुसऱ्या विवाहाचा व्यभिचार तिच्यासाठी पर्याय ठेवला. मेव्हणीनेही तसेच केले. त्यामुळे त्या दोघांनी बंधु आणि भगिनीधर्म टाळला. तुझ्या सासऱ्याने जसे तुझ्याशी त्याच्या मुलीचे लग्न लावून पितृधर्माचे पालन केले तसे तुझ्या सासुने तुझ्या पत्नीला म्हणजे स्वत:च्या मुलीला व्यभिचारापासून दूर राहण्यासाठी संस्कार देण्याची आवश्यकता होती. पण तिने तसे केले नाही म्हणून मातृधर्माची तिच्याकडून अवहेलना झाली. त्यामुळे आता तुला आत्महत्या करुन देहत्याग करता येणार नाही.

अथं चेत्वमिमं धर्म्य संग्राम न करिष्यासि।

तत: स्वधर्म कीर्तींच हित्वा पापम वाप्स्यासि॥

अर्थात, तु जर धर्मयुध्द करण्याचे टाळलेस, तुझे कर्तव्य तु केले नाहीस तर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितच पाप लागेल. त्यामुळे योध्दा म्हणून तु तुझी कीर्ती गमावशील. ऊठ! मी तुझ्यात आता सामील होत आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम॥

परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा मी अवतीर्ण होतो असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. साधु-भक्तांचा उध्दार करण्यासाठी दृष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी युगा-युगात प्रकट होतो. आज सुबोध तुला या माझ्या वचनांतून बोध घ्यायचा आहे. तुझ्या शरिरात माझ्याही आत्म्याचा सहवास राहणार आहे. यापुढे

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेुर्भूमा ते सङ्रेऽऽस्त्व कर्माणि॥

तुझे नियम कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. पण या कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तु कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तु आसक्त होऊ नकोस. उठ! मीही तुझ्यासोबत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama