आई
आई
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
अशी सार्थ साद नेहमी ऐकु येते
आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे ईश्वर
असं सारखं म्हणलं जातं. आज मला ह्या पलीकडे जाऊन आ म्हणजे आकाश / अवकाश / अंतरिक्ष अस म्हणावयाचे आहे. अवकाशात सर्व ब्रह्माण्ड विसावले आहे त्यात कत्येक गृहमाला वसलेल्या आहेत जे मानवाच्या ज्ञान चक्षु च्या पलीकडचे आहे. अनादी अनंत निर्गुण निराकार तोआकार म्हणजे आई .
तशी पहिली आई केव्हा जन्माला आली !! ऍडम व इव्ह पासुन, मग केव्हा पासुन साक्षात ब्रम्हा विष्णु महेश याना लहान बाळ व्हावे लागले व पतिव्रता अनुसया च्या अंगावर स्तनपान करावे असे वाटू लागले. अनुसया ही त्रिमूर्ती ची आई झाली ही आई पहिली आहे निसर्ग / पृथ्वी / वसुंधरा जिच्यात
सृजन सामर्थ्य आहे ती आई का मग सांख्य दर्शन कारच्या मते प्रकृती ही आई आहे.
हो पंच भुत निर्मिती साठी प्रकृती व पुरुष यांचे मिलन झाले. प्रकृती ही त्रिगुणात्मक षड्रिपु युक्त मोहिनी रूप घेतलेली
पुरुष, फक्त चेतना युक्त प्रकाशी ज्ञानी यांच्या मिलनानी पंच महाभूत व पंचभुतात्मक श्रुष्ठि निर्माण झाली जी त्रिगुणात्मक / षड्रिपु युक्त /
हेच नियम पृथ्वीला व पृथ्वी वरील सर्व चराचर प्राणी मात्रांना, पंचभुतात्मक नियम लागु पडतो.
जशी प्रकृती व पुरुष यांची उत्पत्ती एकाच वेळी झाली तदवत
चराचरी नर मादी उत्पन्न झाले
पृथ्वी ची निर्मिती पहिली म्हणुन च पृथ्वी हीच खरी पहिली माता
तीच सर्व चराचर प्राणी मात्रा चे संगोपन करते
जननी जन्म भूमीस्यच
स्वर्गदपी गिरीयसी
माता आई ह्या भूमिकेला निसर्गदत्त शरीर वरदान मिळाले आहे निसर्गाने ज्यास्त जबाबदारी तिच्या वर सोपवली आहे मासिक धर्म नंतर गर्भधारणा / गर्भ पोषण प्रसुती नंतर बाळाचे संगोपन व्हावे म्हणूनच स्तन व स्तनपान
देवा तु माझा यजमान
बाहेर पडता मातेच्या स्तनी। पय केले निर्माण देवा तु माझा यजमान
आई संगोपन करण्यासाठी दिवस रात्र जागते तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते बाळ हुंकार देत असत / रांगु लागले असता /बोबडे बोलत असत अश्या ज्या संगोपन प्रक्रियेत ती जवळची असते एवढं च नव्हे तर बाळाची पहिली हाक ही आई हीच असते
काळ बदलला आई ही संज्ञा जरा मोडकळीस अली अस वाटते कारण आईचे 6 महिन्याची रजा सम्पली की ती नोकरीत रुजू होते
नंतर एकत्र कुटुंब असेल तर बाळाची देखभाल होत असते किंवा मग त्याची भरती बाळ संगोपन केंद्र / उर्फ पाळणा घर
काळची गरज म्हणूनच हे मातेला करावं लागतं मातेचं चित्त नेहमी मुलाप्रत च असत ती नोकरी करते पण कधी 5 वाजतील कधी
मुलाला जवळ घेऊ व त्याचा पोटभर मुक्का घेऊ असे तिला होऊन जाते
जीन पॅन्ट घातली काय किंवा नऊ वारी साडी नेसली काय आई ही आईच असते मुलं कितीही मोठं झालं तरी ते आईला च बिलगते मुलाला काय आवडते काय नाही हे फक्त आईच सांगु शकते. असा हा आत्मा / आकाश व ईश्वर दड लेला चमत्कार म्हणजे आई / माता ह्या शब्दाची व्याख्या होऊ शकत नाही किंबहुना विवेचन पण करता येत नाही
आई म्हणजेच स्वर्ग आई असणे म्हणजे कोड कौतुक पुरवणे मग तो किती का गरीब असो वा श्रीमंत
माझ्या मते ज्याची आई जवळ आहे ( वृद्धाश्रमी नव्हे ) तोच खरा श्रीमंत
जेवढे ह्या विषयावर बोलु तेव्हढे कमीच आहे
आकाशाचा कागद सागराची शाई
केलीतरी आई च प्रेम लिहता येत नाही