mahesh gelda

Classics

2  

mahesh gelda

Classics

आई

आई

1 min
163


 'स्वामी तिन्ही जगांचा। आईविना भिकारी।।

आई एक नाव असतं. घरातल्या घरातलं गजबजलेलं वात्सल्य असतं. लेकरांची माय असते, वासरांची माय असते, दूधाची साय असते, धरणीची ठाय ही असते।

आई असते जन्माची शिदोरी ती कधी सरतही नाही आणि पुरतही नाही. असंच आई एक नाव असतं.


दूधाचे सारे सत्व जसे सायीत एकवटलेले असतात. तसेच, घराचे सारे सत्व आई तुझ्यात सामावलेले असते. माझ्या आईच्या प्रेमाची तुलना मी दुसऱ्या कशातही करू शकत नाही. सत्ता, विद्वत्ता, संपत्ती हे सगळे या गोष्टी आईसमोर क्षुद आहे. आईचे प्रेम सर्वत्र सारखे असते. गरीब, श्ाीमंत असा भेदभाव तिच्या प्रेमात नसतो. संकटकाळी आई आपल्या प्राणांचीही बाजी मारते.


आई या शब्दात सारी महाकाव्ये आहे. या काव्यात सारी माधुर्याची सागरे आहेत. गंगेची निर्मळता, चंदाची शीतलता, सागराची अनंतता, पृथ्वीची अनंतता हे सर्व आईमध्ये पहायला मिळते. आईकडे प्रेमाचे भांडार आहे. आईचे रूप श्वेत आहे. म्हणून साधुसंतांनी आपल्या अंभवाणीने रचले आहे.


''आई सारखे दैवत असता माझ्या घरी।


कशाला जाऊ मी पंढरपुरी।।'


''इकडे पूज्य माय, तिकडे पूज्य गाय।


मेहनतीस कोटी देव, धरती तिचे पाय।।


आई सारखे दैवत। साऱ्या जगात नाही।।


अशा आईने क्षणोक्षणी आपल्या वाटेत फुलं टाकली. पण आपण चुकूनही तिच्या वाटेत काटे टाकू नये.


''प्रेमस्वरूप आई: वात्सल्यसिंधू आई,


बोलावू तुज आता कोणत्या उपायी।


थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार।।


मातृदिन फक्त आईची महती गाऊन साजरा करायचा नसतो. अरे! मी एक सांगायचे विसरून गेलो. आई या शब्दाचा अर्थ होतो 'आपला ईश्वर'. ९ महिने जिने अंनत दु:खे झेलत आपल्याला ओटीपोटी बाळगले त्या जगातल्या तमाम मातांना माझा मानाचा मुजरा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics