ऑनलाइन प्रेम
ऑनलाइन प्रेम
प्रेम करून लग्न करा अथवा लग्न करून प्रेम करा. शेवटी आयुष्यभर साथ देणाऱ्या व्यक्तीला महत्त्व आहे. सर्रास लैला-मजनू च्या भाषेत ते दोन जीव फक्त एकमेकांसाठीच बनले होते..आणि ते त्यांनी सिद्ध ही करून दाखवले. प्रेमात जी ताकद आहे ती कोणत्याच गोष्टीत नाही. नाण्याला दोन बाजू असतात. तशीच प्रेमाची दुसरी बाजू बर्बादी आहे.
प्रेम करून लग्न करणे काय चुकीचे नाही पण त्यातून कोणालाच सुख लाभत नाही. नाही त्या प्रेमवीरांना ना कोणत्या व्यक्तीला ना समाज्यातील आपले हितकुटुंब दर्शविणाऱ्या लोकांना...
आयुष्यभर साथ देईल असाच जोडीदार निवडा.
सर्रास प्रेमाला आपला समाज विरोध करतो आणि त्यातून नैराश्य, दुःख , यातना, भीती कधीतरी खून केले जातात. कधीतरी करियर धोक्यात येत. हातात काही नसताना लैला मजनू च्या बाता म्हणजे
तोंड करते बाता
......खाते लाथा !
आजकालच्या पिढीच कसं झालंय ना , प्रेम करा मग विरहात जगा, आठवणीत झुरा , साठवणीत स्वतःला जाळा , आणि हसत्या खेळत्या जीवनाला जिवंत तिरडी बांधा...
कुण्या ज्ञानी माणसानं सांगितलं आहे. प्रेम करा ते करा आणि वरती life च वाटोळं करून घ्या...
चार-पाच दिवसाच्या मानसिक सुखासाठी अकर्षणाला प्रेमाचं नाव दिलं जात. तात्पुरत मानसिक समाधान जीवाला मिळवता. तुम्ही लोक कुठला भविष्याचा विचार ना पचार...
प्रेम केलं तर निभवा ना...
कश्याला म्हणायचं आपली जात वेगळी आहे आपल्याला लोक नाव ठेवतील ...
करायचंय ना मग करायचं
आणि एक सुखी जीवनसाथी म्हणून लोकांना बोचले पाहिजे. इतक्या आनंदात सुखानं संसार करायचा. मग कोणीच तुम्हांला तुमच्या जीवनात अडपदडे घेऊन येणार नाही.. काही चुतीया लोकांची लक्षण बघा ना चार दिवस मोबाइलवर जाणू, पिल्लू, सोन्या करायचं. पाचव्या दिवशी नाही आमच्या घरी कळलंय आता बास इथेच हे प्रेम. थु असल्या लंपट प्रेमाची भाषा करणाऱ्या लोकांवर.
स्वतः ला तर मानसिक सुख मिळत नाहीच नाही; पण फक्त आपण स्वतः आपल्या दोघांचा विचार करून कोणीही आडवे येवो. त्याला आपण आपल्या प्रेमाच्या ताकदीवर हरवू शकतोच पण पुढे काय... आणि हो जीवन जगण्यासाठी फक्त प्रेम नाही लागत. त्याला अनेक मूलभूत सोई सुविधा गरजा यांची पूर्तता करावी लागते... नाहीतर मग दोघांमध्ये सतत भांडणे त्यात एकमेकांना साथ द्यायलाही दोघेच...
अधमधी कोणीच पाल्य वर्ग नसतो ना बापमाणुस. समजून काढुन सुखाचे, संसाराचे ज्ञानाचे, डोस पाजणारे नसते .
मग कुठे तो संसार...
आणि कुठे आपण...
लग्न करून प्रेम कसाय ना ;; आता काय आख्या पिढीने पूर्वी: आधी प्रेम मग लग्न या गोष्टीच केल्या का ? एखादं असेल जे पूर्णतः success झाले असेल त्यालाही मनाची खंबीरी लागते ...मानसिक तयारी मनाची कणखरता असावी लागते. आपल्या दोघांशिवाय आपल्याला कोणीच नाही ही भावना ठेवून आयुष्यभर साथ द्यावी लागते...
असे कधी झालेच नाही दोघांमध्ये भांडण होत नाहीत मग त्या वेळी वडीलधाऱ्या माणसांनी मध्यस्थी घेऊन संसाराची नाडी घट्ट बसवता येते....
शेवटी कोणतीच गोष्ट चुकीची नाही पण त्याची वैचारिक क्षमता महत्त्वाची आहे आणि जीवनात यशस्वी होऊन दाखवण्याची आहे.

