STORYMIRROR

mahesh gelda

Children Stories Children

2  

mahesh gelda

Children Stories Children

छत्रपति शिवाजी महाराज

छत्रपति शिवाजी महाराज

2 mins
84

हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजीराजा


ही ओळ आपण ज्या नरसिंहाला उद्देशून म्हणतो ते म्हणजे 'शिवाजी महाराज'.


शिवाजी महाराज महाराष्ट्राचे 'युगपुरुष' होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहेत. आपल्या भारतभूमीला नेहमीच अभिमान वाटावा, असे ते भारताचे दैवत होते.

या महापुरुषाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी गडावर झाला आणि शिवनेरीवर नवा सूर्यच उगवला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजविले.

बालपणी जिजाऊ शिवाजी महाराजांना शूर वीरपुरुषांच्या व संतांच्या गोष्टी सांगत. शिवरायांचे गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव. त्यांनी लहानग्या शिवबास लष्करी शिक्षण दिले. तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भालाफेका, घोड्यावर रपेट यांसारख्या सर्व शिक्षणात शिवबा तरबेज होते. मराठी माणसांत पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो, असा विचार त्यांच्या मनात घोळत असे.


त्यांनी लहानपणापासूनच मावळे गोळा करून त्यांचे नेतृत्व केले. जसजसे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ लागले, तसतसे त्यांनी एकापाठोपाठ एक किल्ले जिंकून स्वराज्याचा श्ाीगणेशा केला. त्यांनी रायगड, प्रतापगड, विशालगड, पन्हाळा असे गड जिंकले. त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, पासलकर यांसारखे शूरसैनिक होते. त्यांनी स्वराज्यासाठी आपला प्राण पणाला लावला. अफझलखानाला ठार मारले. तर शाहिस्तेखानाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाने तुरूंगात टाकताच अतिशय चलाखीने व सावधपणाने आपली सुटका करून घेतली. शिवारायांजवळ प्रचंड धाडस, गनिमीकावा, आत्मविश्वास, प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येकवेळी त्यांचा विजय झाला.

शिवाजी महाराजांना अन्यायाविरूद्ध खूप चिड होती. ते जातीभेद, धर्म मानत नसत. गुणी व शूर माणसांची त्यांना पारख होती. शिवरायांनी तांब्याची 'शिवराई' आणि सोन्याचा 'होम' अशी नाणीही प्रचारात आणली. 'गोब्राह्माण प्रतिपालक राजा' अशी त्यांची ख्याती होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आदर्श 'राज्य कसे असावे' व आदर्श राजा कसा असावा, हे दाखवून दिले. शिवारायांनी आपल्या आज्ञापत्रात झाडांची काळजी घेण्याबाात सांगितले आहे. विनाकारण वृक्षतोड करू नये, असे त्यांनी बजावले आहे. आज आपण हेच एकमेकांना सांगतो आहोत. झाडं जगली तरच आपण जगणार आहोत, ही गोष्ट महाराजांनी ४०० वर्षांपूवीर् ओळखली होती. या एकाच गोष्टीवरून ते दष्टे पुरुष होते हे दिसून येते. आज आपण दहशतवाद, पाणीटंचाई, महागाई, जातीय दंगली या अनेक समस्यांना तोंड देत आहोत. शिवराय आज असते तर या सगळ्या समस्या नक्कीच सुटल्या असत्या. या महापुरुषाचा मृत्यू १६८० मध्ये झाला. या थोरपुरुषाला माझा प्रणाम.


Rate this content
Log in