पुस्तकी कीड़ा
पुस्तकी कीड़ा
विचार येतात बरेच विचार येतात. मग काय राहू द्यायचे तसेच मनातल्या मनात घुटमळत. म्हणून म्हटल तुमच्याबरोबर शेअर करायचे. आता पहा लगेच दहावीची परीक्षा संपली. दहावीची पोर जाम खुश झाले असतील. त्यांना वाटले असेल कि चला सुटलो एकदाचा तेव्हाचा अभ्यास अभ्यास करत सगळी घरची मंडळी मागे लागली होती. बऱ्याच पालकांनी त्यांच्या मुलांवर अभ्यास करायची मक्तेदारी तर केलीच असेल.
माझ्या मनात विचार आला कि चला ते तरी बर झाल कि सचिन तेंडूलकर च्या वडिलांनी त्याला नुसता अभ्यास कर असे म्हटले नाही. नाहीतर आजचा हा महान खेळाडू “मास्टर ब्लास्टर सचिन” आपल्याला पाहायला मिळाला नसता. हो वडिलांना वाटत कि पोराने अभ्यास केला पाहिजे, पोरगा शिकला पहिजे पण हेही पहायलाच पाहिजे कि पोराला आवड कशात आहे? त्याच म्हणन काय आहे? नाही तर नुसता अभ्यास हा पर्याय नाही.
आता पहा Thomas Edison म्हणतो “Tomorrow Is My Exam But I Don't Care Because A Single Sheet Of Paper Cannot Decide My Future.”
हो हे बरोबर आहे कि एवढ मोठ वाक्य जर आपण म्हणतो तर निदान दुसर जे काही करायचं आहे ते तरी करून दाखवायला पाहिजे.
आता दुसरा तो Newton च पहा ना झाडावरून डोक्यावर सफरचंद पडल तर ते खायचं सोडून तो विचार करतो. म्हणे कुठला? तर “झाडावरून सफरचंद खालीच का पडल असेल?”
आपल्यासारख्यान ते सफरचंद खाऊन निवांत झोप काढली असती. कुठून असे विचार येतात कोण जाने.
माझा मित्र म्हणत होता कि scientist व्हायचं असेल तर वेड्यासारखा विचार करायला हवा. मी म्हटल तू वेड्यासारखा विचार कर आणि तू वेडा का आहे हे आम्ही पाठपुरावा देऊन सिद्ध करू म्हणजे झालो आम्ही scientist.
कधी कधी असही होत… माझी M.Tech ची एक्झाम होती त्यामुळे मी अभ्यासाला लागलो आता चिंता होती ती म्हणजे अभ्यासाची नाही हो! केसांची. माझे केस जास्त गळत होते तेव्हा परीक्षेपेक्षा जास्त मला माझ्या केसांची काळजी वाटत होती. हे आईला कळलं तेव्हा आई हसूनच म्हणाली “अरे परीक्षेमध्ये तुझ डोक कामात येईल केस नाही”. मी पण हसूनच म्हटल “हि परीक्षा मी पुढच्या सेमिस्टरला देऊ शकतो पण केसांचं काय?”.
प्रश्न हा आहे कि लहानपणापासून पोरांवर पालकांनी केलेली सक्ती योग्य आहे का? मुळीच नाही. तर जगू द्याव आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार आणि चुकल असेल तर दाखऊन द्यायची त्यांची चूक काय आहे ते. नुसता अभ्यासच कर असेही म्हणणे योग्य नाही.
