Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

veena joshi

Romance


5.0  

veena joshi

Romance


आभास

आभास

7 mins 1.8K 7 mins 1.8K

आज लवकर आटोपले असे वाटताच शरयु ने घड्याळा कडे पाहिले अरे वा!खूपचं लवकर असे म्हणून तिने स्वतःसाठी छानशी कॉफी करून आपल्या आवडत्या red मगात ओतून ती ग्यालरीत आली व आराम खुर्चीत बसली . गाणे लावण्यासाठी तिने मोबाईल ऑन केला तिच्या आवडीचे सुंदर गाणेलागताच ती अधिकच आनंदी झाली "प्रिया आज माझी नसे साथ दयाया " गाणे केव्हा संपले तिला कळलेच नाही कारण डोळे बंद करून ती केव्हाच भूतकाळात पोहोचली होती.....

दोन जिवलग मित्र 'निसर्ग' सोसायटीत आपापल्या कुटुंबा सह राहत होते .रमेशराव आणि सुधीरराव लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते आणि योगायोग पहा ना दोघांनाही एकाच सोसायटीत राहण्याचा योग आला .रमेश रावां ना एक मुलगी आणि सुधीररावा ना एक मुलगा होता दोन्ही कुटुंब सण वार पिकनिक गेट टु गेदरआळीपाळीने एकमेकांच्या घरीसाजरीकरत होती .अगदी दृष्ट लागावी अशी ही दोन कुटुंबे होती.

आज रविवार दोन्ही कुटुंबे रमेशरावांकडे बसली होती जेवणं आटोपली आज मस्त बेत असल्यामुळे सगळी सुस्त झाली होती .सगळी हॉल मध्ये येऊन बसली आणि गप्पा मारू लागली इतक्यात रमेशराव म्हणाले अरे सुधीर ऐकतो का जरा! माझ्या मनात एक कल्पना आलिया !काय ती ? सुधीर म्हणाला सगळे कांन देऊन ऐकू लागले आपण अस करू या का ?आता माझ्या शिरिषच शिक्षण पूर्ण झालं आहे तेव्हा शिरीष आणि शरयू च लग्न ठरवून टाकू म्हणजे आपली नाती अधिकच दृढ होतील .असे म्हणताच शिरीष आणि शरयू दोघेही डोळे विस्फारून पाहू लागली .बाबा काय बोलताय हे!असे म्हणायच्या आतच शिरीष उभाराहून म्हणाला काका मी बोलू का थोड!बोल की तुला कशाची मनाई! काका माझ्या व शरयू मध्ये तशा felling नाहीतच मुळी ती मला मोठा भाऊ मानते व मी तिला लहान बहीण .अरे वा!!हे तर फारच उत्तम no probleam विषय तिथेच थांबला .इकडच्या तिकडच्या गप्पा होऊन कुटुंब आपल्या निवासस्थानी झोपायला गेले .

दुपारचे दोन वाजले असतील रमेशरावांना दारात बघताच मिनलता ई म्हणाल्या आज इतक्या लवकर !काही विशेष अग ऐक ना! एक महिन्या पासून माझ्या मनात सारखी पाल चुकचुकत होती अग बाई !कशाची?काही काळजीच कारण नाही न?विस्फारित नेत्रांनी मिनल ताई म्हणाल्या नाही ग एक महिन्या पासून मला वाटत होतं या वर्षी आपली Transpher होणार आणि बघ order आली पण .अरे देवा!कुठली ? मुंबई! बर जाऊ द्या त्याला उपाय नाही मी तर घाबरले च होते बाई!हं तुला काय लागते घाबरायला रमेशराव पुटपुटले संध्याकाळी ही बातमी सुधीर कुटुंबाला कळली पण उपाय नाही म्हणून सगळ्यांनी positive घेतली .

लागलीच दुसऱ्या आठवड्यात सुधीरराव आपल्या कुटुंबासह मुंबई ला रवाना झाले अर्थात मित्र कुटुंब पोहोचवायला स्टेशनवर आले होते हे सांगणे नको पहिला आठवडा शरयुला खूप जड गेला कारण प्रत्तेक गोष्ट शिरीष सोबत share करायची तीला सवय होती .दिवस जात होते शरयू चा अभ्यास चालू होता . अचानक एक दिवस शरयू गाडी पार्किंग मधून काढत असताना एक मुलगा पुढे आला एकदम स्मार्ट पाहता क्षणी नजर खिळावीअसा Hii !!! मी सौरभ त्याने हात पुढे केला माफ करमी ओळखले नाही तुला मी तुमच्या बाजूच्या कॉलेज मध्ये असतो आणि हो तुम्ही ज्या aparment मध्ये राहता तेथील मागच्या aparment मध्ये मी राहतो .जात येता बघतो मी तुम्हाला .आज ओळख करून घ्यावी म्हटले !हाय हॅलो झाल्यावर दोघेही आपापल्या मार्गाने गेलीत सुध्दा.

आता इतक्यात 2/3 दिवसा आड दोघांची भेट व्हायला लागली हळूहळू भेटीचे रूपांतर मैत्रीत व मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे दोघांनाही कळले सुद्धा नाही .त्यांची मैत्री अगदी वाखा ण ण्या जोगी होती . एका गाडीवरफिरणेनाही; प्रेमाच्या आणा भा का नाही की फारसी जवळीक नाही अवांतर गोष्टी आणि अभ्यास हे त्यांचे विषय त्यामुळे कोणाला संशयाचे कारणच नव्हते.

एक दिवस सौरभ शरयू ला म्हणाला माझं आता हे last year मला लगेच campus through नोकरी मिळेल नंतर एक वर्षाने आपण आपल्या आईबाबांना सांगून लग्न करू चालेल न तुला! ok माझी काहीच हरकत नाही असे शरयू त्याला बोलली .असे छान दिवस चालले होते .

अचानक सौरभ तिला भेटेनास झाला .कुठेच तो दिसेना बर फोन करावा तर नंबर दोघांनीही घेतला नव्हता तशी गरजच भासली नाही मुळी! अपारमेंटला जावे म्हटले तर विना कारण चर्चा तिला काही कळेच ना !ती बेचैन झाली आणि तसे तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले अशीच एक दिवस ती ग्यालरीत बसली असतांना मिनल ताई म्हणाल्या अग शरयू काय झाले एवढ्यात तू जरागप्प गप्प असतेस.

पूर्वीच्या गप्पातर तुझ्या बंदच झाल्या चेहरा बघ आरशात सुकला कसा! काही problem? नाही ग आई तसे काही नाही थोडा अभ्यासाचा ताण नि दादापण नाही इथे बाकी काही नाही .मिनल ताईंना तिचे कारण योग्य वाटले व त्या कामाला निघून गेल्या. शरयूमात्र विचार करतबसली

सहा महिने वर्ष दोन वर्ष निघून गेले पण सौरभ चा पत्ता लागलाच नाही आता शरयू चे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आई बाबांची तिच्या लग्नाविषयी कुणकुण सुरू आहे असे तिला जाणवले .पण ती काही बोलू शकत नव्हती आपले आई बाबा नवीन विचारसरणीचे आहेत हे तिला माहीत होते पण कशाचाच पत्ता लागत नसल्यामुळे आपण आई बाबांना काय सांगणार? हा प्रश्न तिला पडला .शेवटी मूग गिळून गप्प राहणेच तिला योग्य वाटले.

बदली झाल्यापासून मुंबई ला ये मुंबई ला येअसे सारखे सुधीर रमेशच्या मागे टूमणे लावत होताशेवटी या महिन्यात जाऊनच यावे असे रमेशराव व मिनालताईने ठरवले .तिथे जाऊन शरयूच्या लग्नासंबंधी चर्चा करावी असे त्यांना वाटले व ते सहकुटुंब मुंबई ला रवाना झाले .ते येताच सुधीरराव व प्रज्ञाताई एकदम आनंदित झाल्या एकमेकांना मिठीच मारल्या दोघांनी. शरयू व शिरीष हे विस्फारल्या नेत्रांनी पाहत होते .त्यांनापण खूप आनंद झाला. पण कुणास ठाऊक शरयू शिरीष ला पहिल्यासारखी fresh वाटली नाही .काय कारण असावे बर!े असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला.

दुसऱ्या दिवशी शिरीष शरयू ला म्हणाला चल आपण morning walk ला जाऊया आणि छान साठलेल्या गप्पा मारुया असे म्हणून दोघेही बाहेर पडली .थोडं चालून गेल्यावर शिरीषने मूळ मुद्याला हात घातला काय ग शरयू काय अवस्था करून घेतली ही तुझा तर नूरच बदलला पार!काय झाले काही problem ?नाही रे दादा तस काही नाही !असं होय! दादापासून लपवतेस? मी ओळखत नाही तुला !असे म्हणताच शरयू चा डोळ्यातुन गंगायमुना वाहू लागल्या शिरीष ने तिला एकाbench वर बसवले. जवळचे पाणी दिले आणि ५ मी . शांत बसू दिले. त्याला माहित होते काय झाले ते शरयूआपल्या जवळ नक्कीचसांगणार थोड्या वेळाने शरयुने शिरीषला तू गेल्यावर काय काय घडले दोघांनी काय ठरवले आणि तो अचानक कसा गायब झाला हीसर्व आपबीती त्याला सांगितली आणि आपला शेवटचा निर्णयही सांगितला. शिरीष ने विचार केला तो मुलगा काही बदमाश नसावा पण यायचे असते तर तो आता पर्यंत कसाही आला असता किंवा संपर्क तरी साधला असता हे नक्की त्यामुळे शरयूचा निर्णय त्याला योग्य वाटला .आपला निर्णय दादाला पटला हे पाहून शरयूला पण छान वाटले आणि सर्वात महत्वाचे दादासोबत प्रत्येक गोष्ट share केल्यामुळे तिला एकदम डोक्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले .दोघे परत आले तर दोघांचेहव ी चेहरे अगदी प्रफुल्लित दिसत होतेआपल्या मुलीला कित्येक दिवसांनी आनंदी पाहुन मिनल ताई समाधान पावल्या.

संध्याकाळी लग्न या विषयावर चर्चा झाली रमेशरावांनी ऋणानुबंधावर अगोदरच शरयू चे नाव नोंदविलेले होते आलेली स्थळे त्यांनी सुधीरला व नोकरी या दृष्टीने शिरीष ला दाखवली त्यातील एक स्थळ सगळ्यांना पसंत पडले.

मुंबईलाच विचारविनिमय झाल्यावर पुढल्या रविवारी मुलगी बघायला येण्याचा program fixs झाला अर्थात त्या दिवशी सुधीरची family मित्राकडे येणार हे निश्चित रविवार असल्यामुळे सुटीचा प्रश्नच नव्हता

ठरल्याप्रमाणे ठीक ११ वा. मंडळी आली चहापाणी वगैरे झाला स्वयंपाक तयारच होता तत्पूर्वी बघण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरले आईच्या म्हणण्यानुसार शरयू तयार झाली डार्क पिंक लेगीन वर light pinkकुर्ती अगदी सुंदर दिसत होती शरयू .दिसायला तर ती सुंदर होतीच उंची 5.5"गोरा रंग मोठे भावपूर्ण डोळे लांब केस समोर येताच सगळ्यांच्या डोळ्यात सौंदर्याची तारीफ दिसली .शरयू व शंतनू ला एकमेकांशी बोलायचे का विचारले असता दोघांनीही नकारार्थी मान हलवली . दोन दिवसांनी कळवावे या बेसवर बैठक संपली.

मुलीकडील सर्वांनाच मुलगा खूप आवडला होता. दिसायला तर Handsome होता तो पण अगदी नम्र आणि विचारी वाटला शिवाय एकुलता एक आणि घरी समृद्ध देखील. दोन दिवसांनी एकमेकांना मॅसेज करण्यात आले अर्थात दोन्ही कडून होकारच होता.

लवकरच शुभमुहूर्त पाहून शरयू- शंतनूचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला दोन्ही कडची मंडळी समजूतदार असल्यामुळे लग्न व्यवस्थित पार पडले .

शरयू सासरी आल्यावर जरा घाबरलीच एवढा मोठा बंगला सासू-सासरे नवरा सगळ्यांची मने आपण जिंकू शकू का? याची तिला जरा भीती वाटली पण थोड्याच दिवसात ती दूर झाली . कारण सासू व नवरा तिला प्रत्येक ठिकाणी समजून घेत होते हळूहळू सर्व ठिक झाले पण म्हणतात ना, भित्या पाठीमागे ब्रम्हराक्षस पुन्हा तिचा भूतकाळ डोकं काढू लागला हे शंतनू ला जाणवू लागले कधी कधी झटके आल्यासारखे का वागते ही!पण तो तिलाकाही जाणवू देत नसे .असह्य होऊन शरयुने एक दिवसशंतनू ला सगळी आपबीती सांगितली .पण यावर शंतनू काहीच न बोलता शांत राहिला. शरयू ला वाटले हा खूप रागवेल वाट्टेल तसा बोलेल पण never एक अक्षर ही न बोलता तो शांत झोपला आणि दुसरया दिवशीही नेहमी सारखा normal वागला.

आज देखील तसेच झाले शरयू आराम खुर्चीवर डोके ठेऊन डोळे बंद करून होती तिच्या डोळ्यातुन अखंड अश्रुधारा वाहत होत्या शंतनू ५ मि. झाले तिच्या बाजूला येऊन उभा होता. पण तिला कळले ही नाही. ही अतीच रडतेय हे पाहून शंतनु तिच्या जवळ गेला व दोन्ही हातानी तिचे अश्रू पुसू लागला पण ते आहेत की थांबण्याचे नावच घेत नव्हते तो सारखा रुमालाचा वापर न करता तिचे अश्रू हातानेचपुसत होता शेवटी एकदाचे तिचे रडणे थांबले ती ताडकन उठली स्पर्शाने तिने जाणलेच होते की हे हात शंतनु चे आहेत तिने त्याचे दोन्ही हात हातात घेऊन हळुवारपणाने दोन्ही हाताच्या तळव्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली खूप खूपधन्यवाद शंतनु तुझेIm Proud Of You तू मला पटवुन दिले की माझा भूतकाळ म्हणजे केवळ एक आभासहोता शिवाय काहीही नाहीआणि ती भर्रकन किचन कडे वळली शंतनू तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच राहिला सुंदर तर ती होतीच त्याने आपल्या हाताकडे पाहत एक गोड smile दिली आणि एक छानशी धून शिटीवर वाजवित त्याची पाऊले आपोआप बेडरूम कडे वळली.


Rate this content
Log in

More marathi story from veena joshi

Similar marathi story from Romance