STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

यश...!

यश...!

1 min
901


यश....!""


यशाच्या साध्या साठी

श्रमाची पेरणी करावी लागते

श्रमाच्या उभारणीवरच

यशाची तहान भागते...


तहान यशाची

जन्मभर अतृप्तच वाटते

जेव्हां खूप काही

यशासाठी करण्याचे बाकी रहाते...


यश दुधारी तलवार असते

त्याचे मोजमाप नियती ठरवते

नियतीच्या पुढे काही चालत नसते

म्हणून तर यश परावलंबी असते...


प्रवलम्बत्वात यातना वसते

स्वावलंबाने ती दूर करावी लागते

जेंव्हा यातना सारणे शक्य होते

तेंव्हा कोठे यशाचे दर्शन घडते....!


सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational