येऊन जा...
येऊन जा...
आसुसले कान माझे
ऐकण्या आवाज तुझा
मनातलं गुपित
कानामध्ये हळूच सांगून जा...
शिणले डोळे
वाट पाहुनीया आता
तू नजरेच्या भाषेने
नजरेशीच बोलून जा...
मनाची जीवघेणी घालमेल
वाढतच चालली आहे
बघ होण्याआधी उशीर
भेटण्यासाठी एकदा येऊन जा...

