STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

3  

vaishali vartak

Romance Others

ये रे घना ये रे घना

ये रे घना ये रे घना

1 min
145

आले मेघ दाटुनिया 

झाली गर्दी अंबरात

उडे पाचाळो वा-याने

बरतील  ते क्षणात


किती पहावी रे वाट

ये रे घना ये रे घना

व्याकुळली सारी सृष्टी 

देना हर्ष तना मना


लागे चाहुल पक्षांना

बघ उडती नभात

पंख पसरी मजेत

घाव घेती घरट्यात    


थंड झुळुक वा-याची

करी मना प्रफुल्लित

मोर दावी नृत्य त्याचे

आसमंत आनंदित


ये रे घना ये रे घना

न्हाऊ घाल वसुधेला

तप्त भेगाळली काया

कर शांत तू धरेला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance