ये जिवलगा ये...
ये जिवलगा ये...
ये जिवलगा ये
ह्या मोहरलेल्या क्षणांना
मज जवळी तू घे...
गंधाळले मी
तुझ्या प्रेमात सख्या
अंतर-बाह्य...
तुझ्या प्रेमाचा रे
प्रेमरस मज
चाखू दे...
उरात काहूर भीतीची
त्याहून आतुरता
मिलनाची...
नको आता काही जादा
फक्त तू माझाच रहा
हा मात्र कर वादा...
मिटु दे आता
चंद्राच्या ही
पापण्या...
कवेत घे असा
जणू ओंजळीत माझ्या
सुखांच्या रे चांदण्या...
श्वासात श्वास
मिसळू दे
आता...
गारवा ही सुटू दे
घट्ट मिठीत तुझ्या
पापण्या ह्या मिटू दे....
ये जिवलगा ये
शहारले आता
अंग-अंग माझे...

