व्यथा वडाची
व्यथा वडाची
ओळखले का मला मी वड
थोडी आज काढ ग सवड..
वटवृक्षाच्या छाये खाली बाहेर पड..
वेळेअभावी तूझी असते शॉर्टकट पूजा
पाने फांद्या तोडून मला मिळते ग सजा
होतात ग खूप यातना
माझ्या पाने नि फांद्या कापताना
तू आहेस आधुनिक सावित्री,
करुन पहा ना निसर्गाची मैत्री
तोडलेल्या फांद्या पाने न घेता तूच कर बंदी
मलाही जगुदे आजच्या दिवशी आनंदी
या शुभदिनी माझीच होते कथा..
तुझ्याचकडे मांडतो आज माझी व्यथा
