चतुर कावळा
चतुर कावळा
काळ्या काऊला लागली एकदा तहान खूप..
सगळीकडे रखरखीत ऊन नि धूप।
तहानलेला जीव त्याची पाण्यासाठी धाव..
करी काव काव काव..
करी काव काव काव..
इकडे तिकडे शोधून शोधूनि दमला..
कुठे मिळेल का हो पाणी कुणी सांगेल का मजला?
कुठेच नाही वाव!
करी काव काव काव..
करी काव काव काव..
लांबून दिसला त्याला पाण्याचा एक घडा..
पाहुनी जीव क्षमला त्याचा तो वेडा।
आता काय करायचं हो राव!
करी काव काव काव..
करी काव काव काव..
आनंदाने उड्या मारत तिकडे जाई
आत डोकावून सारखं सारखं पाही
पार तळाशी गेलं रे सारे पाणी..
तहानेने झाले आता जिवाचं पाणीपाणी।
आता कुठंच नाही ठाव!
करी काव काव काव..
करी काव काव काव..
आता चालवी जरा डोकं,व्याकुळलेला काऊ..
इकडे तिकडे मिळते का काही शोधूनि पाहु..
एक एक करून चोचीतून टाकीत होता खडा।
दगडी साचून भरुन गेला रिता पाण्याचा घडा।
हळूहळू आले पाणी वरती
चोचीला लागले पाणी आली आनंदाला भरती।
सापडले स्वर्ग नि सुखाचे गाव
करी काव काव काव..
करी काव काव काव..
पाणी पिण्यासाठी काळू काऊ झाला आतुर..
चालवून डोकं, इतिहासात झाला तो चतुर
