STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational

4  

Shobha Wagle

Classics Inspirational

व्यापात नसते मी

व्यापात नसते मी

1 min
273

कुणाच्या फालतू वादात नसते मी

तसेही फारसे व्यापात नसते मी


मला आहे तसेही व्याप कामाचे

उगी दुसऱ्या कुणा फंदात नसते मी


मनाला मी किती सांगू कसे सांगू

मनाच्या मालकी विश्वात नसते मी


व्यथेची कारणे मी जाणते आता

व्यथेच्या आणखी छंदात नसते मी


जरी मी खर्चिले सारे मुलांसाठी

मनाच्या बेगडी गुंत्यात नसते मी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics