वसंत
वसंत
रंगात रंग भरताना
प्रेमाचे गीत गातो
का रस भंग होतो?
मंत्रमुग्ध होवून फुलांत
भुंगा मधु रसपान करतो
नव कळी उमलून
नव रंगांत सजली
का कुस्कराव्या कळ्या?
सृष्टीच्या नव रुपात
प्रीतीच्या सुगंधात फुलली
बहरुन आला वसंत
कामनेचे मारुन तीर
का जागते निराशा?
आले मिलनाचे दिस
उडू द्या मनात पाखरं भिरभिर
वसंत प्रणय धुंदीत रममाण
प्रीतीची कळी हृदयात फुलली
का मारावे मनाला?
प्रेमात जगून पाहावं
हातात हात घालून
क्षितिजापलीकडे एकांतात बसावं

