वसंत पंचमी
वसंत पंचमी
पिवळ्या धम्म मोहरीचे, पिवळे पिवळे रान
पिवळ्या गव्हाळ ओंबीचे, नवं वस्त्र परिधान।।धृ।।
आज चाहूल वसंताची, पालवी कोरी घाल
पुजा विद्या देवीची, ज्ञानाची माळ माळ।।१।।
सृष्टी सौंदर्य सोहळा, सुख समृद्धीचा लळा
नव चैतन्याचा मळा, वसंत पंचमीला माघ।।२।।
ब्रह्मदेवाची निर्मिती, विष्णू किर्ती पुजती
सृष्टी मानव जगती, वसंत पंचमीचा मान।।३।।
देवी चतुर्भुज दर्शनी, गोदा गंगेचा सन्मान
भल्या पहाटे उठूनी, होई गरम कुंडी स्नान।।४।।
गोडधोड पक्वान्ने, नव कामांची सुरुवात
हळदीच्या टिळ्याने, गाऊ वसंताचं गाणं।।५।।
