STORYMIRROR

Poonam Jadhav

Action Inspirational Others

3  

Poonam Jadhav

Action Inspirational Others

वृक्षसंवर्धन

वृक्षसंवर्धन

1 min
189

पाखरांचे थवे उडेनासे झाले,

फांदीवर पक्षी बसेनासे झाले,

प्रगतीच्या नावाखाली माणसा,

तु सिमेंटचे जंगल उभारले


तुझेच कर्तृत्व तुला नडले,

ऑक्सीजन चे सिलिंडर ,

विकत तु आणले,

ते पण भेटेना म्हणून प्राण गमावले


सुधर माणसा,

आता तरी हो शहाणा,

बरा नाही निसर्गाशी खेळ,

तु आहेस इथला पाहुणा,


फोटो काढून, बैनर लावुन,

नको करु नुसता दिखावा,

लावलेल्या रोपट्याला जोपासायला,

थोडासा वेळ द्यावा


झाडं लावलीस तु उत्साहाने,

पण संवर्धन करण जमलंच नाही,

कामात तुझ्याच गुंतलास इतका,

त्यांचं दुःख तुला कळलंच नाही


एकदा वेळ देवून तरी बघ,

खत पाणी त्याला घालून तरी बघ,

रोपट्याचे होईल झाड,

वृक्ष संवर्धन करुन तर बघ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action