STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

4  

Mangesh Medhi

Inspirational

वळीव

वळीव

1 min
347

धडाम धुडूम धडाम धडूम ढगांचा ढोल

कडाडकड कडाडकड विजेचा ताशा

सोसाट्याचा वार संगे पावसाचा ताफ़ा


आला आला आला आला वळीव आला बघा वळीव आला

साऱ्यांची धावपळ धुळीची वावटळ

लखलखत्या उजेडात झाडांचा रॉक  


आला आला आला आला वळीव आला बघा वळीव आला

बत्ती गुल फ़ोन बंद कामे सारी पडली बंद

निसर्गाचा तांडव बघायची मज्जा


आला आला आला आला वळीव आला बघा वळीव आला

धोबी पछाडने धुतले रान वाहुन गेली सगळी घाण

पहिल्या पावसाने चिंब स्नान न्हाऊन निघाले अंग छान


आला आला आला आला वळीव आला बघा वळीव आला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational