STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

विषय-- हरवून जाते मन

विषय-- हरवून जाते मन

1 min
141

येता जलमोती खाली

जीव जातो वेडावून

नव्या स्वप्नांच्या कुशीत

धरा जाते हो गुंतून...


श्रावणाची हिरवळ

पसरता चहुकडे

निसर्गाचे नवे रूप

पुन्हा नव्याने सापडे...


शीळ घाली थंड वारा

नदी वाही झुळझुळ

बीज उगे मातीतून

सारी जगवाया कूळ...


दिसे शिवार साजरे

काय सांगू त्याचं रूप

मनी मोर पिसाऱ्याचं

चढे लावण्य हुरूप....


आभाळाच्या काळजाचं

धरतीला मुक्त देणं

गंध मातीला येताच

हरवून जाई मन....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational