STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

विसरू नको

विसरू नको

1 min
477


उपकार खूप केले अशांना विसरू नको

आयुष्यभर ज्यांनी पोसले त्यांना विसरू नको


नऊ महिने गर्भात ठेवून वाढविले त्या

गरीब माय माऊलीला तू विसरू नको


तुझे टीचभर पोट भरण्यासाठी त्यांनी

सोसले किती कष्ट त्या कष्टाला विसरू नको


शिक्षण घेण्यासाठी ज्यांनी तुझे बोट धरले

शाळेत घेऊन जाणाऱ्या हातास विसरू नको


तुला काय हवे अन काय नको याची

काळजी करणाऱ्यास विसरू नको


शिक्षण झाले पूर्ण नोकरी मिळाली

घास खाताना भाकरीस विसरू नको


लग्नानंतर राजा राणीचा संसार झाला

मुलगा जन्मला बापास विसरू नको


आई वडील कधी भार होत नाहीत

जन्मदात्या माता पित्यास विसरू नको


ज्याने तुला शाळेचा रस्ता दाखविला 

त्याला घरात मान द्यायला विसरू नको


संसार म्हटलं की असतातच वादविवाद

त्याचे निराकरण करायला विसरू नको


उपकाराचे फेड याच जन्मी करायचे

आई-वडिलांची सेवा करण्यास विसरू नको


मिळेल तुला जीवनात सुख-शांती समाधान

स्वतःच्या कर्तव्याला कधीच विसरू नको



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy