STORYMIRROR

Shashikala Gunjal

Tragedy

4  

Shashikala Gunjal

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
436

दुष्काळाच्या निखाऱ्यात होरपळतो पाय 

दीनदुबळी झाली माझी शेतकरी माय

रहाया नाही घरं दार ऊन करी लाह्या 

दुष्काळाच्या निखाऱ्यात होरपळली काय


 भरभरा वाहतोय सोसाट्याचा वारा

 गुर ढोरं अंगनात मागतात चारा 

झाडे वेली तान्याजली कस पाजू पाणी 

 घरामध्ये खाऊ मागतात बाळं माझी तान्ही

 पान फूल गळूनिया झाली रानोरानी 

भुई सारी भेगाळली धरणीमागते पाणी


घालतोय साल बाप पोटासाठी 

लेखी आलया लग्नाला कशा बांधू गाठी

गुडघ्यात मान घालून बसलाय बाप्

 कोणापुढे मदतीचा मागावा हात


किती संकट आलं तरी बांधतोय बळं 

कर्ज झाल डोईवर आली आत्महत्याची वेळ 

अंगातले बळ गेले खचले हो पाय 

दीनदुबळी झाली माझी शेतकरी माय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy