STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

4  

Jaishree Ingle

Tragedy

खोल

खोल

1 min
385

सर्व माहित असून तुला बोलत नाही 

गुपित तुझ्या दग्याचं मी खोलत नाही....


तू तुझ्या काळजाचं दार कधी ना खोले 

तुझ्या बदललेल्या रंगांना झेलत नाही.....


प्रेमाची माझ्या तू मोडली आहेस आस 

तू दिलेल्या जखमा आता सोलत नाही....


देवाहून जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर 

कसा करू मी ध्यास श्वास चालत नाही......


तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं मी स्वप्न

माझ्या ओल्या पापण्या उचलत नाही.....


जागून काढेल रात्र संगम आता एकटा 

तुझ्या बेईमान प्रेमाचा डोंगर पेलत नाही.....


देवाहून जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर 

कसा करू मी ध्यास श्वास चालत नाही......


तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं मी स्वप्न

माझ्या ओल्या पापण्या उचलत नाही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy