विश्वास
विश्वास
विश्वास ठेवा
थोरामोठ्यांवर
आणि देवावर
मिळेल मेवा ||१||
विश्वास मूल्य
वापरा जपून
आणि पारखून
आहे अमूल्य ||२||
विश्वासघात
घडतोच जिथे
मारामारी तिथे
व घातपात ||३||
आत्मविश्वास
अंगी बाळगावा
दृढच असावा
आपला ध्यास ||४||
विश्वात शांती
परोपकाराने
आणि विश्वासाने
घडेल क्रांती ||५||
विश्वासानेच
जुळतात बंध
नात्यांना सुगंध
प्रेम देतेच ||६||
दुनिया सारी
विश्वासावरच
निर्भर खरंच
मानवा तारी ||७||
