प्रेमाची चांदणी
प्रेमाची चांदणी


चांदणी तू शुक्राची।
शोभते नील नभात।।
उजळून दे ज्योत जीवनाची।
माझिया प्रीतिच्या प्रकाशात।।
नयन तुझे कमलाकार।
ओष्ठ तुझे गुलाबपाकळी।।
जीवनास माझिया दे आकार।
भरून दे प्रेमाने माझी झोळी।।
केश तुझे मुलायम रेशमी।
काळे जसे नयनी काजळ।।
तुझिया भेटीसाठी नेहमी।
मन माझे होते व्याकुळ।।
तुला पाहता मन हे गाई।
मनमंदिरी नाचे मोर थुईथुई।।
हृदयी उमलती जाईजुई।
मन माझे हरपून जाई ।।
चर्यामुद्रा तुझी मोहक।
हसणे तुझे निर्मळ छान।।
वाट पाहतो हा पक्षी चातक।
शमवून दे हृदयाची तहान।।