बरस रे मेघा
बरस रे मेघा
1 min
99
मेघा रे मेघा रे
नको तू दूर जाऊ रे
आज तू पर्जन्य
वर्षाव कर रे।।धृ।।
चिरा पडल्या धरतीला
आसवेही सुकली
पिडा सोसवेना तिला
ओढ तुझी लागली।।१।।
पाण्याविना जग सारे
मुर्च्छित रे झाले
नद्या नाले आणि झरे
कोरडे रे झाले।।२।।
बळीराजाची परीक्षा
नको रे तू घेऊ
पोशिंद्याला भिक्षा
नको मागू देऊ।।३।।
पशु-पक्षी सारे
धरतीची लेकरे
पाण्यासाठी वणवण
भटकती सारे।।४।।
