विरहिणी
विरहिणी
दुनिया करी सवाल मी त्या जबाब काय देऊ ?
माझीही विफल प्रीत मी कुणास दाऊ?
त्याला कुणी विचारा तुज प्रेयसी का?
ते काळीज अपुले तू कोणास रे दिले का?
दीन रात वाट त्याची सांगा किती मी पाहू?..(१)
सांगा तयास कोणी मी काय सोसते होरातीस
जागन्याची सजा मी रोज भोगते हो
बोलू कसे कुणाशी पसरू कसे मी बाहू?..(२)
माझेच हाल झाले वाटे न त्यास काही
मी दुःख भोगते कळणार त्यास नाही
आजार वाढला मी दवा कोठली घेवू?..(३)

