विरह
विरह
का घेतला निरोप तुम्ही जगाचा घोर लाविला मना!
अकस्मात निघून गेला कुणा ना सांगता!
भाकीत हे दैवाचे ते कुणा ना कळले!
तगमग ही मनी अबोल झाली वाणी!
मुक्या जिवाची दैना आसवांची रैना!
भासातला भास वाढू लागे ऐसा!
मंद हवेची झुळूक घेवून संगे! पारिजातकाच्या गंधा अवतारा तुम्ही अंगणा!
गंध आठवणीचा आजही दरवळे!
परी लुप्त होता झुळूक गंध जाई वार-यावरी!
पुन्हा करीते विनवणी या पवन होऊनी!
सुवास तुमच्या भेटीचा शोधतसे रात राणीच्या गंधात!
आठवता बोल तुमचे उरात होते धग धग!
रातराणी बनूनी तुम्ही!
सडा पडावा अंगणी!
सुगंध तुमच्या आठवणीचा!
बरसू दे माझ्या अंगणात!
