प्रीत
प्रीत
1 min
77
शब्दाविना भावना अनावर
ठाव घेती मन मनाचा!
तारकानी आभाळ भरले!
विरहाने तव चक्षू दाटले!
मनमंदिरी मुरत सजली!
तव प्रतिची आस बांधली!
चंद्र तो आभाळी खुलला!
रवि तू हृदयी तळपला!
तव येण्याची चाहूल लागली!
ओठ अधीरले नयन भरले!
सुख सागरी हासू खुलले!
मुखकमलावर लाज गहीवरली!
प्रीत तुझी माझी अशी!
नव्याने जशी जन्म घेते कळी
फुल होवूनही झुलते डहाळी!
गाली हासली वेल लेकूरवाळी!
