STORYMIRROR

Ranjana Bagwe

Others

3  

Ranjana Bagwe

Others

*जुणी वाट*

*जुणी वाट*

1 min
214

जुण्या वाटेवर माझे ते गाव!.

पाहूनिया डोळा लागला लळा!

ईथच जन्मलो ईथेच खेळलो!

लाल तांबड्या मातीत दुडू दुडू धावलो!

नदी ओहळात मनसोक्त डुंबलो!

राना वनात ,डोंगर कपारीत! लपा छपी खेळ, किती मी खेळलो!

आठवे मज ,संवगड्यांची ती शाळा !

नाव नसलेली, कुठेही भरलेली!

स्नेह जवळीक ,मायेच कौतुक!मैत्री अशी ,

आपूलकी लाभलेली!दु:खात सुखात, फुंकर होती मायेची!

करूणेच्या डोहात ,थेंब थेंब आनंदाचे!

कधी कधी मज वाटे सारखे सारखे!

कश्या पाई मोठा मी जाहलो!

खेळ माझे आमराईतले!

वार-याच्या सोबतीतले!

स्वप्ने अशी विखुरलेली!

गत काळीच्या झुल्यात राहीलेली!

गेले ते क्षण चुरगळले ते मन!

बाल पण माझे ते जुण्या वाटेत हरवले!

येई याद बाल कील्ला राखल्याची!

ऐसे दु:ख गड हरल्याचे!

गहीवरले डोळे,जुण्या वाटेत भिजले!

सखे सोबती मनात राहील


Rate this content
Log in