STORYMIRROR

Ranjana Bagwe

Others

3  

Ranjana Bagwe

Others

श्रावणी गुज

श्रावणी गुज

1 min
119

आषाढ संपला श्रावणमास तो अवतरला !

सोबतीला घेवून सणांची नांदी !

अध्यात्मकतेचा लेवूनी साज !

बरसला घन निळा !

श्रावण सरी झरझरल्या !

 घट फुटले दुग्धाचे !

 दर्शन हरीत धरतीचे!

सण ते श्रावण मासातले !

घरा घरा सांगती गुज दैवतांचे 

पाहुनी सुष्टीचे ते लावण्य !

अवखळत्या मनात आनंदाचा वास वाहे !

क्षण सुखावूनी जाती वाऱ्यासंगे डोलती !

श्रावणातले हे गुज श्रावणात बहरते !

संताच्या कार्याची माहिती सांगून !

सोबतीला व्रतवैकल्याची कास असावी !

श्रावण येई पून्हा फिरूनी .. 

नव्याने पुन्हा जगणे प्रतिक्षेची आस लावूनी !

श्रावण सांगुनी जाई!.


Rate this content
Log in