किमया
किमया
कळले नाही मोल कुणाचे !
कळली नाही भावना !
देवा तुझी अशी कशी रे दुनिया !
या दुनियेची रित न्यारी !
एक मेका पुसेना कुणी!
येता मना तैसा वागे!
पाऊले ही पडती मागे!
पैसा अडका याला मोल !
या साठी जाई सकलांचा तोल!
ऊरली नाही कुणा ठाई ममता!
प्रेम माया ही पैश्याची किमया!
पैसा बोले पैसा चाले !
दिनाना मग पुसती कोणी!
दिनांचा कैवारी तुच देवा!
पैश्याची ही बोलकी दुनिया!
पैसा देवा मानवानी बनविला !
माणूस देवा तुच घडविला!
का देवा अशी दशा हिन दिन!
गरीबांचा कैवारी ऊरला ना कुणी!
धनिकांना लाडी गोडी !
गरीबीला हाडी हाडी!
बापुडा गरीब हिन दिन !
खाई देवा कोंडा भाकर!
भाकरी साठी राबे दिन भर!
तयाच्या नशिबी काय!
भाकर मिळेना फिरोनी वन वन!
अश्या दुनियेची देवा !
रित असे न्यारी!
सांग ना देवा का घडविली किमया सारी!!