विरघळूनी तुझ्यात
विरघळूनी तुझ्यात


मनाचिये कारभारी
कुठवरी सांभाळावे
किती लोटले माघारी
केली तुजवरी प्रिती.
कशी शरण आले मी
या प्रेमाच्या भुलाव्यास
अलगद घे जवळी
लाजणार्या या फुलास.
स्पर्शाचे तुझे बहाणे
थोपवू कसे कळेना
ही शिरशिरी हवीशी
रे सर्वांगी दाटली ना.
माझी मी राहिले नाही
श्वासात माळले श्र्वास
गुंतल्या मनी भावना
छळतील दिन रात.
कैफात कैफ चढला
मज धुंद चांदण्यात
कर शांत घे कवेत
विरघळूनी तुझ्यात.