STORYMIRROR

anjali dixit

Tragedy Others

3  

anjali dixit

Tragedy Others

अनाथ

अनाथ

1 min
32

मला कुणी गाॅडफादर भेटलाच नाय

हात धरून चालायला कुणी शिकिवलंच नाय

मी एकटाच आलोय दूरच्या काळोखातून

अंधार्या खाचखळग्यातूऩ़़...

रडत, पडत,टेंगळानं भरलेलं कपाळ घेऊन

पर मायेचा हात कधी पाठीवर फिरलाच नाय,

मला कुणी...

थंडीचा कडाका उर फुटेस्तोवर पडला

पर एक चादर चार जणांत पुरलीच नाय.

कितीदा गिळली भाकर पाण्याच्या घोटावर

पर कोरड्या दुष्काळाला पाझर कधी

फुटलाच नाय,

मला कुणी....

आता मी पण शिकलोय जुलमानं

काजव्यासोबत रान घुमायला,

खोपटातला दिवा विझवून,रातभर जळायला.

काटं रूतलं निब्बर पायात, तरी रगत आता येत नाय,

मला कुणी....

समजावलंय स्वत:लाच,आरं बास झालं रडणं,

खुडत कुढत जगणं आन् दगडाला पाया पडणं.

आता आभाळ माझा बाप अन् माती माझी माय,

गाॅडफादर काय कुणाच्या जल्माला पुरलाय?

अनाथाची हेटाळणी आता ऐकणार नाय,

आन् मी रडत आता बसणार नाय

आन् मी रडत आता बसणार नाय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy