STORYMIRROR

anjali dixit

Classics Inspirational

4  

anjali dixit

Classics Inspirational

जीवन काय आहे?

जीवन काय आहे?

1 min
497

जीवन काय आहे?

कुणी म्हणेल बहार

कुणी म्हणेल प्रहार

कुणासाठी मवाळ तर कुणासाठी जहाल


कुणी म्हणेल जीवन म्हणजे गोड गाणी

जीवन म्हणजे रसाळ वाणी

तर कुणासाठी जीवन म्हणजे

फक्त पाणी


कुणी म्हणेल जीवन म्हणजे साहस

जीवन म्हणजे सच्ची मैत्री,

जीवन म्हणजे प्रेेम झकास, हळव्या

मोरपीसावाणी


कुणासाठी जीवन ठिगळांची गोधडी, 

सुरूकुुुुतलेल्या हातांनी कच्चे धागे विणलेली 

त्याच्यासाठी जीवन मायचा ओला सहवास

जणू अखंडपणे तेवणाऱ्या समईचाच भास


कुणी म्हणेल जीवन म्हणजे अलवार बदल, 

पानगळीनंतर येणारी ऋतू चैतन्याची लहर

जीवन म्हणजे कल्पतरू, 

जीवन म्हणजे प्रवास,

जीवन म्हणजे बकुळीच्या फुुुलांचा

धुंद सुवास


कुणासाठी पैैैैसा तर

कुुुुुणासाठी श्रद्धा जीवन,

कुणासाठी कळी तर

कुुणासाठी फूल जीवन 

अखेर जीवन म्हणजे काय❓

एक तीन अक्षरी शब्द;

ज्याच्या शेेवटी तेे उरत नाही आणि

सुरूवातीला ते कळत नाही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics