STORYMIRROR

anjali dixit

Others

3  

anjali dixit

Others

रम्य विरह

रम्य विरह

1 min
253

किती दिसांची पाहते रे 

मन वाट तुझी चातकासम.

शिणले मम ओले नयन

अन् भासे तू काजव्यासम.

का अबोल्याने छळतोस तू असा रे

झाले हृदय अशांत घायाळ पक्षिणीसम.

लागेल मज लळा रे या खोल अमूर्ततेचा

मग शोधशील कोठे वेडावल्या सख्यासम.

येशील जवळी आता, घेशील हात हाती

परी न रम्य वाटे काळ त्या विरहासम.


साहित्याला गुण द्या
लॉग इन