फूल उंबराचे
फूल उंबराचे
1 min
587
नको टाकुस उलथूनी
हे हात चांदण्याचे
न मिळेल परतुनी पुन्हा
हे फूल उंबराचे!
मनी दाटला जिव्हाळा
तोडू नको सख्या रे
स्पर्शातल्या उबीचे
उसवू नको किनारे!
कर तृप्त या धरेला
घट भरूनी अमृताचे
घे पिऊनी चातकापरी
थेंब ओल्या सरींचे!