STORYMIRROR

Amol Tambe

Tragedy

3  

Amol Tambe

Tragedy

**विद्रोहाची लेखणी.......**

**विद्रोहाची लेखणी.......**

1 min
539

पिसाटलेल्या वाऱ्यासारख्या

भिकार मना

उन्मत झालेल्या नराधमा

तुझे लिंग कसे पिसाटले

तुझी,

आई,बहीण,बायको,मुलगी

दिसली नाही का?रे तिच्यात

तू तिच्या पवित्र योनीला

भोक समजलास

तुझ्या,

पिसाटलेल्या ताठर लिंगाचा

भोग समजलास

अरे, सृष्टी जन्मली त्यातून

निर्मितीचे'विश्व'ते विसरलास

अरे,

वासनेने तहानलेल्या 

मती भ्रष्ट नागड्या

तुझे लिंग कसे पिसाटले.....

आता,

आवर घाल तुझ्या,

पिसाटलेल्या ताठर लिंगाला

तहानलेल्या मानसिकतेला

घृणास्पद तुझ्या नजरेला...

आता,

उसळताहेत लाटा

तप्त ज्वाला भडकतोय

चौकटीचा चुराडा होतोय..

सहनशील मनाचा,

विस्फोट होतोय

आणि,

आभाळ कवेत येतंय

नराधमा,लक्षात ठेव

तुझ्या पिसाटलेल्या ताठर 

लिंगाची

तहानलेल्या मानसिकतेची

आणि तुझ्या घृणास्पद 

नजरेची

अंतिम यात्रा

नक्की निश्चित अटळ

अगदी बेछूटपणे.......

निघणार आहे...

कारण,

ती अबोली बोलकी झाली 

ती बंधमुक्त स्वच्छनंद झाली

ती खंबीर शस्त्र झाली

ती रक्षणीय स्वतः भिंत झाली

नव्हे नराधमा,

ती आता

धार धार शब्द होऊनि

विद्रोहाची लेखणी झाली

विद्रोहाची लेखणी झाली........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy