STORYMIRROR

Amol Tambe

Tragedy

2  

Amol Tambe

Tragedy

वाट पाहते...

वाट पाहते...

1 min
951

आई विषयी 

थोडं लिहिताना.

शब्दच अपुरे पडू लागले

कदाचित

तिचे वर्णन करायला,

तिला उपमा द्यायला

शब्दही अपुरे असावेत

माझ्या मनात आणि

त्या शब्दकोशातही


आई ,

उदरात साहून वेदनांचा भार

जन्म देते लेकराला

पोटी भूक असता

तरी ,

पहिला घास 

लेकराला भरवते 

मग

तोच हात..

नेहमी घरचांच्या

भुकेसाठी तत्पर असतो.

अगदी,

पहाटे ते उशिरा रात्रीपर्यंत

दिवसभराच्या

कामानंतर ....जेवणानंतर.....

दोन घास तोंडी घेते 

मग,रात्री उशिरा

पहाटे जागे झालेले

तिचे डोळे

झोपी जातात.....


आई,

अगदी जिवाच्या शेवटच्या 

क्षणापर्यंत आपल्या

घरट्याला अगदी प्रेमाने

मायेने

आपुलकीने 

सदैव बांधून ठेवते

घरट्याला सजवते....


ती अडाणी असो

अथवा

ती शिकलेली

आपल्या पिलांच्या

पंखात बळ, सामर्थ्य

भरून...

त्यांना उतुंग

गगन भरारी घेण्यास

झटते...

आणि शेवटच्या श्वासापर्यंत

पिलाचाच विचार करते

करत असते...


ती एक सामर्थ्य

ती एक मायेचा झरा

कधीच न आटणारा

ती एक अस्मानी

कधी कधीच न दूर होणारी

अटळ अगणित छाया


आज मात्र 

आई हरवते आहे 

मनातून...

इथल्या

शिक्षित डोचक्यातून

कारण

इथली भरलेली वृद्धाश्रमे

बोलतात

वृद्धाश्रमातील आई बोलते

माझा मुलगा डॉक्टर

माझा मुलगा इंजिनिअर

माझा मुलगा ....

वेल एज्युकेट

आणि

वाट पाहताहेत

तिचे डोळे

तिचे मन

तिची माया

डॉक्टर, इंजिनिअर, वेल एज्युकेट

मुलाची 'वेळेत' आणि 'पैशात'

हरवलेल्या पाखराची...

'वेळेत' आणि 'पैशात'

हरवलेल्या पाखराची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy