STORYMIRROR

Amol Tambe

Others

4  

Amol Tambe

Others

एक प्रश्न ?

एक प्रश्न ?

1 min
401

मी आभाळात ,पाण्यात

निळा रंग पाहिला

मी रानात पानात झाडांत

हिरवा रंग पाहिला

मी,शिवबात सम्यक क्रांतीत

भगवा रंग पाहिला

निळा भगवा ,सफेद ,हिरवा

देशाच्या तिरंग्यात पाहिला

आणि तिरंगा तर सदैव

भारतीय म्हणूच फडकत असतो

इथले झाडन झाड

इथले आभाळ सर्वांना

समान छाया छत्र देत असतात

शिवबा समानता,मानवता

शिकवतात..


कधीच कुठल्या रंगात

जात दिसत नाही

जाती धर्माचा

जरासा लवलेश ही

दिसत नाही

फक्त रंगहीन चित्राला

रंगीन बनवतात हे रंग

आणि, उधळतात रंगीत छटा

समानतेची शिकवण देत........

सदैवपणे..


मात्र इथल्या बिनडोकानी

इथल्या प्रत्येक रंगांना

दिल्या जातीच्या वाटा

आणि वाटून घेतले रंग

मांणसा माणसात

कोण म्हणे

भगवा हिंदूंचा

कोण म्हणे

हिरवा मुस्लिमांचा

कोण म्हणे

निळा जयभीमवाल्यांचा

तेव्हा

कळत नाही काहीच

एक प्रश्न पडतो मनाला

या रंगाचा जन्म

जाती जातीत

केव्हा झाला????

या रंगांचा जन्म

जाती जातीत

केव्हा झाला?????


                


Rate this content
Log in