बाई
बाई
1 min
175
बाईला वांझोटी म्हणणाऱ्यांनो
बाई कधीच वांझोटी नव्हती
आणि असणारसुद्धा नाही
ममता, करूणा, भरलेला
अथांगपणा,
क्रांती, आधार, असलेला
अथांगपणा,
म्हणजे बाई .....
वांझोटी, बाई नव्हे तर,
वांझोटे तुमचे विचार
तुमचे मन.....
धर्मांधाच्या विषावर
जगणारे बांडगुळ जणू
तुम्ही स्त्री जातीच्या गर्भातून
जन्मलात....
म्हणून
तुम्हाला बाईला, वांझोटी
बोलण्याचा शून्य अधिकार.....
आणि बोलत असाल तर
तुम्ही तुमचा जन्म नाकारून
अगदी ठार व्हावे.....
निर्जीवरुपी......
