विचार मनाला?
विचार मनाला?
पावसात भिजताना
धारेत त्या दिसतेस
विचार मनाला तुझ्या
माझ्यात तू कोठे नसते?
या फुलात, त्या पानात
पाहतो तुला मी रे
कळ्यासम उमलत
अलगदच तू हसतेस
विचार मनाला......
गारवा झेलावा कधी
या बोचर्या थंडीचा
ऊब तुझी लाजरी
हळुच मनात भासते
विचार मनाला........
सोसताना ऊन झळा
होतं तन-मनाची लाही
आठवणीतच मग तुझ्या
माझी तहान असते
विचार मनाला तुझ्या
माझ्यात तू कोठे नसतेस?

