STORYMIRROR

@sarika-k-aiwale Aiwale

Abstract Classics Inspirational

4  

@sarika-k-aiwale Aiwale

Abstract Classics Inspirational

वेळ कधी थांबणार नाही

वेळ कधी थांबणार नाही

1 min
0

वेळ  कधी थांबणार नाही 


गर्द जाहली भयाची काळोखी 

मनाची उंची ती ढळणार नाही 

धुसर  जाहली वाट जीवनाची 

आशा उद्याची ती संपणार नाही 


फिरुनी येती आणिक स्मृती 

प्रवास तो जगाचा थांबणार नाही 

थकल्या पावलांनी निरोपाची 

श्वास तो  वाट  पाहणार नाही 


आजची संध्या ती उषा उद्याची 

काळजीत आज मरणार नाही 

दिस रातिच्या याच  खेळाची 

सुरवात  कधी थांबणार नाही 


श्वासा गति मनाच्या ऊभारीची 

क्षणास ती कधी हरणार नाही 

आदी  अंती काय ती शेवटची 

काळाची मुजोरी चालणार  नाही 


ऋतुबदल देई खात्री  जीवनाची 

मृत्यु हेच  शेवटच ठिकाण नाही 

कथामालीका सुरु जन्माची 

अर्ध्यावर पाने ती संपणार नाही 


चादर पसरली जरी ती  भयाची 

हे असच कायम  राहणार नाही 

येतील परतुनी क्षणही सुखाचे 

वेळ तीकोणासाठी थांबणार नाही 


मनास घाल साद  ती विचारांची 

भयास त्या कधी घाबरणार नाही 

हृदयास दे श्वास त्या आसक्तीची 

जगी विशामृत कुणा चुकले नाही 


अविरत चालता विश्वास साथीस 

काळ तो विषाचा जिंकणार नाही 

कास धरली जी सदविचारांची 

श्वास ते अयुष्यास हरणार नाही



✍@sari 

©️सारिका ऐवले.. 




Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract