सौदा
सौदा
जीव का असा गहिवरला क्षण हातून का निसटला
खंत एकच वाटते मनाला नियती संगे सौदा फसला
करार आयुष्याचा ठरलेला अटी शर्तीवर श्वास राखलेला
खेळ जन्माचा असा झाला सौदा स्वप्नांचाही हरलेला
जगाच्या बाजारात दाखल भावुक मनाची या अर्जव
फार काही नाही विचारत कसा वाहू शब्दाचा तया भार
कण मातीचा करतो सवाल ओळखीची दगावली शाही
कायद्याच्या कलमांचा आता चौकाचौकात लागतेय बोली
जीव का असा गहिवरला क्षण हातून का निसटला
खंत एकच वाटते मनाला नियती संगे सौदा फसला
@Sari
©️सौ.सारिका किरण ऐवले
