हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
जग सारे त्या एका इशाऱ्यावर चालते
क्षणाचे पसारे सारे प्रश्न कोणा पुसते
थबकली पाने उराशी विखुरले विश्व ते
भावलेल्या नाटकातील सुत्रे कोण रचिते
साकार चित्रातले ऐक अनामिक पात्र ते
ते खेळ सावल्यांचे मनी का खुपत राहते
पडद्याआड राज्यात एक नाटक रंगत जाते
जग सारे त्या एका इशाऱ्यावर चालते
क्षणाचे पसारे सारे प्रश्न कोणा पुसते
@Sari
©️सारिका किरण ऐवले
